Take a fresh look at your lifestyle.

Aadhaar-Voter ID Link: या सोप्या पद्धतीने आधार कार्डसोबत मतदान ओळखपत्र लिंक करा

ओटीटी न्यूज नेटवर्क

नवी दिल्ली – Aadhaar-Voter ID Link आपण नेहमी पॅन कार्ड आधार कार्डशी लिंक करण्याविषयी ऐकत किंवा वाचत असतो. मात्र, आज मतदान ओळखपत्र म्हणजेच तुमचं वोटर आयडी आधारशी लिंक करण्याची सोपी प्रोसेस सांगणार आहोत. गेल्या वर्षी 20 डिसेंबर रोजी मतदार ओळखपत्र (Voter ID) आधार कार्डशी लिंक करण्याचं विधेयक लोकसभेत मंजूर करण्यात आलं. केंद्रीय कायदा मंत्री किरण रिजिजू यांनी लोकसभेत निवडणूक सुधारणा विधेयक 2021 सादर केलं. या विधेयकाद्वारे लोकप्रतिनिधी कायदा 1950 आणि लोकप्रतिनिधी कायदा 1951 मध्ये बदल करण्यात येणार आहेत. मागील आठवड्यात बुधवारी केंद्रीय मंत्रिमंडळाने या बदलांना मंजुरी दिली होती.

💰Investment Tips: PPF अकाऊंट एक फायदे अनेक; चांगला परतावा, कर्ज, टॅक्स बचत आणि बरंच काही….

मतदार यादीत डुप्लिकेट आणि बोगस मतदान रोखण्यासाठी मतदार कार्ड आधार कार्डशी लिंक करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. त्याशिवाय मतदार यादीही आधारशी लिंक करण्याचा प्रस्ताव आहे.

यामुळे लोकसभा, विधानसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी सामायिक मतदार यादी तयार करण्यात मदत होईल आणि अधिकाधिक पात्र तरुण मतदार बनतील. अधिक पात्र लोकांना मतदार म्हणून नोंदणी करता यावी यासाठी भारतीय निवडणूक आयोग अनेक कट-ऑफ डेट्ससाठी आग्रही आहे.

वाह! याला म्हणतात Best Offer; फक्त ३ रुपयांत १ GB डेटासह, ५६ दिवसांची व्हॅलिडिटी! Jio-Airtel ला धडकी

आतापर्यंत एखाद्या विशिष्ट वर्षात झालेल्या निवडणुकीसाठी, मतदार यादीमध्ये केवळ अशा व्यक्ती नॉमिनेट होण्यास पात्र आहेत, ज्याचं वय त्या वर्षाच्या 1 जानेवारी रोजी किंवा त्याआधी 18 वर्ष पूर्ण झालेलं असावं. निवडणूक आयोगाने सरकारला यासाठी 1 जानेवारी ही निश्चित केलेली कट ऑफ तारीख अनेक तरुणांना निवडणुकीत मतदान करण्यापासून वंचित ठेवते. त्यामुळे ही कट-ऑफ तारीख आता चार वेळा करण्यात आली आहे.

Tiago, Tigor ते Safari, Tata च्या कार स्वस्तात खरेदीची संधी, कंपनीकडून तब्बल मिळतोय ‘इतका’ डिस्काऊंट

असं करा लिंक –

  • सर्वात आधी वेबसाइट https://voterportal.eci.gov.in/ वर जा.
  • आपला मोबाइल नंबर, ईमेल आयडी, वोटर आयडी नंबरद्वारे लॉगइन करा.
  • त्यानंतर पासवर्ड टाका.
  • राज्य, जिल्हा, पर्सनल डिटेल्स नाव, जन्मतारीख, वडिलांचं नाव टाका.
  • डिटेल्स भरल्यानंतर Search वर क्लिक करा.
  • त्यानंतर स्क्रिनवर डिटेल्स दिसतील.
  • ‘Feed Aadhaar No’ वर क्लिक करा
  • आता पॉप-अप पेज ओपन होईल. तिथे आधार कार्ड, आधार नंबर, वोटर आयडी, रजिस्टर्ड मोबाइल नंबर, रजिस्टर्ड ईमेल टाका.
  • सर्व डिटेल्स तपासून Submit वर क्लिक करा.

असेच सुपरफास्ट अपडेट मिळवण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

Comments are closed.