Take a fresh look at your lifestyle.

राज्याच्या पालकमंत्र्यांची यादी जाहीर; पाहा कोणत्या जिल्ह्यात कुणाची वर्णी

0

ओटीटी न्यूज नेटवर्क

मुंबई : बराच काळ प्रतीक्षा केल्यानंतर अखेर राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारने जिल्हानिहाय पालकमंत्र्यांची नियुक्ती केली आहे. नवीन पालक मंत्र्यांची यादी जाहीर करण्यात आली असून यामध्ये १९ जणांवर विविध जिल्ह्यांच्या पालकमंत्रीपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सहा जिल्ह्यांच्या पालकमंत्रिपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. यामध्ये नागपूर, वर्धा, अमरावती, अकोला, भंडारा, गडचिरोली या जिल्ह्यांचा समावेश आहे. देवेंद्र फडणवीस यांच्याकडे नियोजन मंत्री म्हणून या जिल्ह्यांची जबाबदारी असेल.

भाजपत जाणार असल्याच्या सर्व चर्चा निराधार : एकनाथ खडसे

चंद्रकांत पाटील पुण्याचे पालकमंत्री असतील. दीपक केसरकर हे मुंबई शहराचे पालकमंत्री असतील. याशिवाय ते कोल्हापूरचे पालकमंत्रीही असतील. मंगलप्रभात लोढा यांच्याकडे मुंबई उपनगराचे पालकमंत्रीपद देण्यात आले आहे.

दरम्यान, मागील अनेक दिवसांपासून विरोधकांनी पालकमंत्र्यांची घोषणा न झाल्याने शिंदे-फडणवीस सरकारला घेरलं होतं. पालकमंत्री नसल्याने अनेक कामं रखडल्याचाही आरोप करण्यात येत होता. मात्र, आता अखेर पालकमंत्र्यांची यादी जाहीर झाली आहे.

विश्वचषकाची सविस्तर माहिती आणि टीम इंडियाचे सामने

पालकमंत्र्यांची नावे पुढीलप्रमाणे :

  • राधाकृष्ण विखे पाटील – अहमदनगर, सोलापूर,
  • सुधीर मुनगंटीवार – चंद्रपूर,गोंदिया,
  • चंद्रकांत पाटील- पुणे
  • विजयकुमार गावित – नंदुरबार,
  • गिरीश महाजन – धुळे,लातूर, नांदेड,
  • गुलाबराव पाटील – बुलढाणा, जळगाव
  • दादा भुसे- नाशिक,
  • संजय राठोड – यवतमाळ, वाशिम,
  • सुरेश खाडे – सांगली,
  • संदिपान भुमरे – औरंगाबाद (छत्रपती संभाजीनगर)
  • उदय सामंत – रत्नागिरी, रायगड
  • तानाजी सावंत-परभणी, उस्मानाबाद (धाराशिव)
  • रवींद्र चव्हाण – पालघर, सिंधुदुर्ग,
  • अब्दुल सत्तार- हिंगोली,
  • दीपक केसरकर – मुंबई शहर, कोल्हापूर,
  • अतुल सावे – जालना, बीड
  • शंभूराज देसाई – सातारा, ठाणे,
  • मंगलप्रभात लोढा – मुंबई उपनगर

असेच सुपरफास्ट अपडेट मिळवण्याकरिता या लिंकवर क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.