Take a fresh look at your lifestyle.

Loan Guarantor: एखाद्याच्या कर्जाला जामीनदार होताय? आधी ‘या’ गोष्टी समजून घ्या नाहीतर होईल पश्चाताप

0
maher

ओटीटी न्यूज नेटवर्क

मुंबई – पर्सनल लोन (Personal Loan) हे फार कठीण काम नाही आणि तुमचे उत्पन्न आणि क्रेडिट स्कोर (Credit Score) चांगला असेल तर तुम्हाला कर्ज सहज मिळू शकते. परंतु जर तुमचा क्रेडिट स्कोअर चांगला नसेल, तुमच्याकडे उत्पन्नाचा कोणताही खात्रीशीर स्त्रोत नसेल किंवा कर्जाच्या परतफेडीचा तुमचा मागील रेकॉर्ड चांगला नसेल, तर अशा परिस्थितीत बँक कर्जासाठी जामीनदाराची (Loan Guarantor) मागणी करते.

नावाप्रमाणेच, कर्जाचा जामीनदार बँकेला हमी देतो की कर्जदार कर्जाची परतफेड करेल. कर्जदार असे करण्यात अयशस्वी झाल्यास, हमीदार म्हणून मी कर्जाची परतफेड करेल. त्यामुळे त्यातील प्रत्येक पैलू नीट समजून घेणे अत्यंत आवश्यक आहे.

तुम्ही कोणत्या प्रकारचे जामीनदार बनत आहात ते पाहा

बँका 2 प्रकारचे जामीनदार मागतात. एक म्हणजे गैर-आर्थिक हमीदार आणि दुसरा आर्थिक हमीदार. पहिल्यामध्ये तुमचा वापर फक्त संवादासाठी केला जाईल. तर दुसऱ्या प्रकरणात कर्जदाराने पैसे न भरल्यास तुमच्याकडून वसुली केली जाईल.

क्रेडिट हिस्ट्री तपासा

ज्या व्यक्तीसाठी तुम्ही गॅरेंटर बनत आहात त्या व्यक्तीला तुम्ही चांगलं ओळखता का, हे पाहा. तसेच त्याच्या कर्ज परतफेडीच्या हिस्ट्रीवर एक नजर टाका. त्यापूर्वी कर्जाची माहितीही घ्या.

तुमची वैयक्तिक मालमत्ता धोक्यात असू शकते

वर नमूद केल्याप्रमाणे, कर्जदार कर्जाची परतफेड करण्यात अयशस्वी झाल्यास, तुम्हाला पैसे द्यावे लागतील. अशा परिस्थितीत तुम्ही पैसे घेतले नसले तरी विचित्र परिस्थितीत तुमची संपत्ती धोक्यात येऊ शकते.

तुमच्या क्रेडिट स्कोअरवरही परिणाम होऊ शकतो

जर कर्जदार लोन डिफॉल्टर झाला तर त्याचा क्रेडिट स्कोअर खराब होईल तसेच तुमच्या स्कोअरवरही परिणाम होईल. यामुळे तुम्हाला भविष्यात कर्ज मिळण्यात अडचणी निर्माण होऊ शकतात.

Leave A Reply

Your email address will not be published.