Take a fresh look at your lifestyle.

शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारचा मोठा निर्णय; मार्च अखेरपर्यंत होणार तब्बल इतक्या कोटींची कर्जमाफी!

0
maher

ओटीटी न्यूज नेटवर्क

मुंबई – नुकताच विधानसभेत राज्याचा अर्थसंकल्प सादर करण्यात आला. राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी यावेळी अर्थसंकल्प सादर करत यंदाच्या अर्थसंकल्पात शेतकरी हिताचे निर्णय घेण्यात आले आहेत. यावेळच्या अर्थसंकल्प सादरीकरणादरम्यान, फक्त कृषी योजनांचाच नव्हे तर शेतकऱ्यांना वैयक्तिक लाभ देखील मिळणार अशा घोषणा अजित पवारांनी केल्या होत्या. गेल्या दोन वर्षापासून महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेतील उर्वरीत शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा प्रश्न रखडलेला होता. त्यामुळे सध्या विरोधकांकडून घोषणा झाल्या मात्र प्रत्यक्ष अंमलबजावणीचं काय? असा सवाल विरोधकांकडून वारंवार उपस्थित केला जात होता.

अलर्ट! राज्यभरात पुन्हा कोरोनाचा अलर्ट; राज्य सरकारच्या हालचालींना वेग

दरम्यान, यावेळी केवळ घोषणाच नाही तर अंमलबजावणीचं देखील योग्य नियोजन केले आहे. विशेष बाब म्हणजे, या उर्वरीत शेतकऱ्यांची कर्जमाफी मार्च अखेरपर्यंत होणार आहे अशी माहिती राज्याचे सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांनी दिली आहे. 54 हजार शेतकऱ्यांना तब्बल 200 कोटी रुपयांची ही कर्जमाफी असणार आहे. त्यामुळे या महिन्या अखेरीस 54 हजार शेतकऱ्यांवरील कर्जाचा बोजा हा कमी होणार आहे. यासंबंधीची माहिती सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांनी विधान परिषदेमध्ये बोलताना दिली.

चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला उपस्थित प्रश्न

यंदाच्या अर्थसंकल्पामध्ये महाराष्ट्र सरकारने 2 लाखापर्यंत कर्जमाफीची घोषणा केली. मात्र, अंमलबजावणी कधीपर्यंत होणार हे स्पष्ट केले नव्हते. त्यामुळे हे आश्वासन हवेतच राहणार का असा स्पष्ट प्रश्न चंद्रशेखर बावनकुळे यांनी विधान परिषदेमध्ये उपस्थित केला होता. मात्र, यावर उत्तर देताना मार्च महिन्याच्या अखेर पर्यंत 54 हजार शेतकऱ्यांची कर्जमाफी केली जाणार आहे. यासाठी बॅंकांनी 35 लाख थकीत कर्जदार शेतकऱ्यांची माहिती सरकारला दिली होती. त्यानुसार कर्जमाफी केली जाणार आहे असं सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांनी सांगितलं.

हवामान विभागाकडून अलर्ट! महाराष्ट्रातील ‘या’ जिल्ह्यांमध्ये पुढचे 3 दिवस पावसाचे

2 लाखापर्यंतची कर्जमाफी

खरं तर सत्तेत येताच ठाकरे सरकारने शेतकऱ्यांसाठी २ लाखांपर्यंत कर्जमाफी करणार असल्याची घोषणा केली होती. त्यात राज्यातील तब्बल 31 लाख 73 हजार शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळाला होता. या योजनेमुळे राज्य सरकारच्या तिजोरीवर 20 हजार 250 कोटींचा भार देखील पडला होता. मात्र, त्यानंतर कोरोनाच्या प्रदुर्भावामुळे प्रोत्साहनपर रक्कम आणि उर्वरीत 54 हजार शेतकऱ्यांची 2 लाखापर्यंतची कर्जमाफी रखडली होती.

तिसऱ्या जागतिक महायुद्धाविषयी मोठी बातमी ! महायुद्धाचं संकट अटळ?

Leave A Reply

Your email address will not be published.