Take a fresh look at your lifestyle.

कर्ज महागले अन् शेअर बाजारात तेजी

0

ओटीटी न्यूज नेटवर्क

Share Market : आरबीआयने रेपो रेट 0.50 टक्क्यांनी वाढवल्यानंतरही आज भारतीय शेअर बाजारात तेजी दिसून आली. आरबीआयने पतधोरण जाहीर केल्यानंतर बँकिंग शेअर्समध्ये मोठी तेजी पाहायला मिळाली. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स (Sensex) 1016.96 अंकांनी वाढून 57,426.92 अंकांवर बंद झाला. दरम्यान, राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी 276.20 अंकांच्या वाढीसह 17,094.30 अंकांवर बंद झाला.

ट्विटरकरांसाठी गुड न्यूज! आता ट्विट असं एडिट करता येणार

आज सकाळी बाजार उघडला तेव्हा अस्थिरतेची चिन्हे होती. अमेरिकन आणि आशियाई शेअर बाजारातील घसरण आणि आरबीआयच्या व्याजदरात संभाव्य वाढीमुळे भारतीय शेअर बाजारातही विक्री होण्याची शक्यता होती. आज शेअर बाजारात व्यवहार सुरू झाल्यानंतर विक्रीच्या पातळीमुळे बाजार किरकोळ वाढला होता. मग तो पुन्हा खाली घसरला.

उत्तर नागपुरातील दिव्यांग आणि ज्येष्ठ नागरिकांना सहाय्यक उपकरण वितरण १ ऑक्टोबरला

आज सकाळी बाजार उघडला तेव्हा सेन्सेक्स 169 अंकांनी घसरून 56,240.15 वर उघडला. निफ्टी (Nifty) 16,798.05 अंकांवर उघडला. त्यानंतर काही काळ सेन्सेक्स थोडा वाढला होता. त्यानंतर निर्देशांक पुन्हा 250 अंकांवर घसरला. आरबीआयचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी पतधोरण जाहीर केल्यानंतर बाजारात तेजीचा कल दिसून आला.

असेच सुपरफास्ट अपडेट मिळवण्याकरिता या लिंकवर क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.