Take a fresh look at your lifestyle.

कर्ज आणखी महागणार; आरबीआय करणार रेपो रेट वाढीची घोषणा?

0

ओटीटी न्यूज नेटवर्क

नवी दिल्ली : दिवसेंदिवस वाढणाऱ्या महागाईने भारतातील सर्वसामान्य नागरिक चिंतेत आहे. महागाई रोखण्यासाठी आरबीआय (Reserve Bank of India) काय पावले उचलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. यूएस फेडरल बँकेने व्याजदरात वाढ केल्यानंतर महागाई (Inflation) रोखण्यासाठी आरबीआय व्याजदरात 0.35 टक्क्यांनी वाढ करू शकते. आरबीआयच्या पतधोरण समितीची बैठक ३ ऑगस्टपासून सुरू होणार आहे. ५ ऑगस्ट रोजी होणाऱ्या बैठकीत समिती निर्णय जाहीर करेल.

महागाई रोखण्यासाठी आरबीआय रेपो दरात वाढ करण्याची शक्यता आहे. किरकोळ महागाई 6 टक्क्यांच्या वर असल्याने, RBI ने मे आणि जून महिन्यात रेपो दरात 40 बेसिस पॉईंट्स आणि 50 बेसिस पॉइंट्सची (Basis Points) वाढ केली आहे. त्यामुळे आता पुन्हा एकदा आरबीआय ऑगस्ट महिन्यात रेपो दरात वाढ करण्याची दाट शक्यता आहे.

ई-रिक्षा पार केला जगातला सर्वात उंच रस्ता; आनंद महिंद्रांनी केलं कौतुक

अहवाल काय सांगतो?

अमेरिकन ब्रोकरेज कंपनी बोफा सिक्युरिटीजच्या अहवालातही आरबीआयकडून रेपो दरात 0.35 टक्क्यांनी वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तसेच गृहकर्जासह (Home Loan) सर्व कर्जांचे हप्ते महागणार आहेत. फेडरल रिझर्व्हने 2022 मध्ये आतापर्यंत रेपो दरात 2.25 टक्क्यांनी वाढ केली आहे. त्यामुळे, आरबीआयदेखील रेपो दर (Repo Rate) वाढवू शकते. मात्र, भारतातील सध्याची परिस्थिती पाहता रेपो दरात फारशी वाढ करण्याची गरज नाही, असे बँक ऑफ बडोदाच्या (Bank of Baroda) अहवालात म्हटले आहे.

धंद्याची फ्रँचायझी घेताना ‘शंभर’वेळा विचार करा

EMI आणखी महागणार?

अमेरिकेसह जगभरातील केंद्रीय बँका (Central Bank) व्याजदर वाढवत आहेत. मात्र, भारतात तशी स्थिती नाही. परदेशाप्रमाणे व्याजदर वाढवण्याची गरज नाही. आरबीआय व्याजदरात 0.20 ते 0.25 टक्क्यांनी वाढ करेल, असा अंदाज housing.com चे सीईओ ध्रुव अग्रवाल यांनी व्यक्त केला आहे.

कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेडमध्ये भरती; थेट मुलाखतीतून होणार निवड

डीबीसी समूह संचालक आणि वरिष्ठ अर्थतज्ज्ञ राधिवा रावण यांनी आपल्या अहवालात सांगितले की, “रेपो दर 0.35 टक्क्यांनी वाढू शकतो. चलनविषयक धोरण ठरवताना RBI किरकोळ चलनवाढीचा दर विचारात घेते. किरकोळ चलनवाढीचा दर जानेवारी 2022 पासून सहा टक्‍क्‍यांच्या वर आहे, तर जूनमधील 7.01 टक्‍क्‍यांच्या तुलनेत आहे. आता महागाई रोखण्यासाठी आरबीआय काय निर्णय घेते ? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. आरबीआयने रेपो दरात वाढ केल्यास ऐन सणासुदीदरम्यान सर्वसामान्य नागरिकांना महागड्या ईएमआयचा सामना करावा लागेल.”

असेच सुपरफास्ट अपडेट मिळविण्याकरिता या लिंकवर क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.