Take a fresh look at your lifestyle.

तुमचा स्मार्टफोन किंवा आयफोन हरवला आहे का? या ट्रिक्स वापरून मिळवा परत

0

ओटीटी न्यूज नेटवर्क

मुंबई – सध्याच्या काळात क्वचितच एखादी व्यक्ती अशी बघायला मिळेल जिच्याकडे स्मार्टफोन नाही. स्मार्टफोन(Smartphone) सध्या चैनीची वस्तू म्हणण्यापेक्षा अत्यंत गरजेची वस्तू बनली आहे. बहुतांश कामांसाठी आपण स्मार्टफोनवर अवलंबून राहू लागलो आहोत. म्हणूनच, स्मार्टफोन हरवला किंवा चोरी झाला तर आपल्या घरातल्या सदस्याचा नंबरसुद्धा ठाऊक नसतो, अशी वेळ अनेकांवर येऊ शकते. त्यामुळेच माणसांची अनेकदा फजिती होते. फोन हरवला तर तो शोधण्यासाठी काही ट्रिक्स (Tricks) वापरल्या जाऊ शकतात.

तुम्ही अँड्रॉइड युझर असाल, तर फोन हरवल्यानंतर तो शोधण्यासाठी अँड्रॉइड डिव्हाइस मॅनेजरमध्ये फाइंड माय डिव्हाइस या फीचरचा वापर करू शकता. अँड्रॉइड डिव्हाइसची लोकेशन ट्रॅकिंग सर्व्हिस योग्य रीतीने काम करायला हवी असेल, तर तुमच्या फोनचं जीपीएस फीचर ऑन असायला हवं. अन्यथा हे फीचर कोणत्याच कामाचं नाही. तुम्ही अँड्रॉइड डॉट कॉम स्लॅश फाइन्ड (android.com/find) वर साइन इन करून तुमच्या फोनचा माग घेऊ शकता. असं केल्यानंतर तुम्हाला ‘लॉस्ट फोन’चा पर्याय दिसेल. त्या पर्यायाच्या मदतीने तुम्ही तुमचा फोन सोप्या पद्धतीनं ट्रॅक करू शकता आणि त्यामधला डेटाही डिलिट करू शकता.

तुम्ही आयफोन (iPhone) युझर असलात, तर सर्वप्रथम तुम्ही दुसऱ्या डिव्हाइसवरून आपल्या अ‍ॅपल आयडीवर लॉग-इन करून ‘लॉस्ट मोड’ अ‍ॅक्टिव्हेट करा. तुम्ही अ‍ॅपलच्या फाइन्ड माय आयफोन (iPhone) या फीचरचाही वापर करू शकता. फाइन्ड माय नेटवर्कच्या मदतीने तुम्ही तुमचा फोन स्विच ऑफ झाल्यानंतर 24 तासांनंतरही ट्रॅक करू शकता. तुमच्याकडे दुसरं अ‍ॅपल डिव्हाइस नसेल, तर तुम्ही आयक्लाउड डॉट कॉम (icloud.com) या वेबसाइटवर जाऊन या फीचर प्रयोग करू शकता.

Leave A Reply

Your email address will not be published.