Take a fresh look at your lifestyle.

मतदारसंघात मोठा निधी आणला : आमदार लंके

0

संजय वाघमारे, ओटीटी न्यूज नेटवर्क

पारनेर : विरोधकांना गेल्या पंधरा वर्षांत पारनेर-नगर मतदारसंघाचा विकास साधता आला नाही. खर तर त्यांना विकासात रसच नव्हता. महाविकास आघाडी सरकारच्या माध्यमातून गेल्या अडीच वर्षांत आपण मोठ्या प्रमाणावर निधी आणला. विरोधक मात्र विकास कामात अडचणी आणण्याचे काम करत आहेत. विकास कामात आडवे येणाऱ्यांना आपण आडवे केल्याशिवाय राहणार नाही असा इशारा आमदार नीलेश लंके यांनी दिला.

तालुक्यातील वडझिरे, पाडळी आळे, सांगवी सूर्या, जवळे येथील ७ कोटी ७२ लाख रुपये खर्चाच्या विविध विकास कामांचे भूमिपूजन आमदार लंके यांच्या हस्ते झाले.या निमीत्ताने जवळे येथे आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात आमदार लंके बोलत होते. पश्चिम महाराष्ट्र विकास महामंडळाचे माजी अध्यक्ष अशोक सावंत कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. बाजार समितीचे सभापती प्रशांत गायकवाड, माजी सभापती सुदाम पवार, किसनराव रासकर, जवळ्याच्या
सरपंच अनिता आढाव, उपसरपंच गोरख पठारे, जयसिंग सालके, कानिफनाथ पठारे, संदीप रासकर, सुभाष आढाव, सोनाली सालके, जितेश सरडे, राजेश्वरी कोठावळे आदी उपस्थित होते.

आमदार लंके म्हणाले की, गेल्या अडीच वर्षांत आपण विविध विकास कामांसाठी साडेसहाशे कोटी रुपये निधी आणला. विरोधकांना गेल्या पंधरा वर्षांत एवढा निधी आणता आला नाही. त्यांनी जो थोडा फार निधी आणला तोही टक्केवारीचा हिशेब डोक्यात ठेवूनच.मी विरोधकांबरोबर अनेक वर्षे काम केले आहे. त्यामुळे कोणत्या कामात किती टक्केवारी घेतली जायची याची माहिती व पुरावे आपणाकडे आहेत. हे सर्व पुरावे आपण योग्यवेळी जनतेच्या दरबारात ठेवणार असल्याचे आमदार लंके म्हणाले. आपणास विकास कामात रस आहे, टक्केवारीत नाही अशी पुस्तीही त्यांनी जोडली.

पारनेर-नगर विधानसभा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला आहे. त्यामुळे जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवारांची संख्या मोठी असणार आहे. जनतेत राहुन काम करणारांची संख्या मोठी आहे. मात्र सर्वांना उमेदवारी मिळणे शक्य नाही.या वस्तुस्थितीची जाणीव ठेवून ज्या कार्यकर्त्याला उमेदवारी मिळेल त्याला एकदिलाने काम करून निवडून आणण्याची जबाबदारी आपणा सर्वांवर आहे.आपल्यात फूट पडली तर विरोधक फायदा घेतील असा इशारा आमदार लंके यांनी यावेळी दिला.

Leave A Reply

Your email address will not be published.