Take a fresh look at your lifestyle.

वर्षभर कमी खर्चात चालतो ‘हा’ व्यवसाय, कर्जही मिळते 90 टक्क्यांपर्यंत…

0
maher

ओटीटी न्यूज नेटवर्क

मुंबई : कोरोना संकटाना खासगी क्षेत्रात नोकरीची कोणतीही सिक्युरिटी नाही हे स्पष्ट झाले आहे. अनेकांना या संकटात नोकऱ्या गमवाव्या लागल्या. त्यामुळे आपला स्वत:चा चांगला व्यवसाय असावा ही प्रत्येकाची इच्छा आहे. मात्र बिझनेस म्हटलं की त्याला लागणारी गुंतवणूक आड येते. मात्र जर तुम्ही काही व्यवसाय सुरू करू इच्छित असाल तर कमी पैशाची गुंतवणूक करुन सुरू करता येऊ शकतो अशा बिझनेसची आज माहिती देत आहोत.

हा व्यवसाय चालतो बाराही महिने

पोहा मॅन्युफॅक्चरिंग युनिट हा एक चांगला व्यवसाय आहे. बाराही महिने चालणारा हा व्यवसाय आहे. पोहे हे पौष्टिक अन्न मानले जाते. नाश्तामध्ये याची सर्वाधिक मागणी आहे कारण हे बनवायला आणि पचण्यास दोन्ही सोपं आहे. त्यामुळेच पोह्यांची बाजारपेठ झपाट्याने वाढत आहे. अशा परिस्थितीत तुम्ही पोहा मॅन्युफॅक्चरिंग युनिट स्थापन करून तुमचा व्यवसाय सुरू करू शकता. खादी आणि ग्रामोद्योग आयोगाच्या प्रकल्प अहवालानुसार, एका पोहा मॅन्युफॅक्चरिंग युनिटची किंमत सुमारे 2.43 लाख रुपये आहे. यामध्ये तुम्हाला 90 टक्क्यांपर्यंत कर्ज मिळेल. अशा परिस्थितीत पोहा मॅन्युफॅक्चरिंग युनिटचा व्यवसाय सुरू करण्यासाठी तुम्हाला केवळ 25,000 रुपयांची व्यवस्था करावी लागेल.

सुमारे 90 टक्के कर्ज मिळू शकते

तुम्ही प्रकल्प अहवाल तयार केला आणि ग्रामोद्योग रोजगार योजनेंतर्गत कर्जासाठी अर्ज केला तर तुम्हाला सुमारे 90 टक्के कर्ज मिळू शकते. ग्रामोद्योगाला चालना देण्यासाठी KVIC कडून दरवर्षी कर्ज दिले जाते. तुम्हीही याचा लाभ घेऊ शकता. प्रकल्प सुरू केल्यानंतर कच्चा माल घ्यावा लागतो. यासाठी सुमारे सहा लाख रुपये खर्च करण्यात येणार आहेत. याशिवाय तुम्हाला सुमारे 50 हजार रुपये खर्च करावे लागतील. अशा प्रकारे तुम्ही सुमारे 1000 क्विंटल पोहे तयार कराल. ज्यावर उत्पादन खर्च 8.60 लाख रुपये येईल. तुमचे 1000 क्विंटल पोहे सुमारे 10 लाख रुपयांना विकले जाऊ शकतात. म्हणजेच तुम्ही जवळपास 1.40 लाख रुपये कमवू शकता. हा युनिट उभारण्यासाठी सुमारे 500 चौरस फूट जागा आवश्यक आहे. पोहे मशीन, भट्टी, पॅकिंग मशीन आणि ड्रमसह लहान वस्तू आवश्यक असतील. KVIC अहवालात असे सांगण्यात आले आहे की, या व्यवसायाच्या सुरुवातीला काही कच्चा माल आणा, नंतर हळूहळू त्याचे प्रमाण वाढवा. त्यामुळे अनुभवही चांगला येईल.

Leave A Reply

Your email address will not be published.