Take a fresh look at your lifestyle.

खुशखबर! होळीपूर्वी फक्त 643 रुपयांमध्ये मिळतोय गॅस सिलिंडर, आताच करा बुकिंग

0
maher

ओटीटी न्यूज नेटवर्क

मुंबई – गेल्या काही दिवसांपासून गॅस सिलिंडरच्या किमतीत मोठी वाढ झाली आहे. घरगुती वापरायचा सिलिंडर जवळपास 1 हजार रुपयांना मिळतोय. मात्र तुम्ही होळीच्या आधी सिलिंडरची बुकिंग करत असाल तर, तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. होळी सणाच्या पूर्वी तुम्हाला गॅस सिलिंडर फक्त 634 रुपयांना मिळू शकतो. मात्र हे कसं शक्य आहे जाणून घेऊयात थोडक्यात.

वाढत्या महागाईच्या काळात सरकारी इंधन कंपनी Indian Oil कॉर्पोरेशनने ग्राहकांना दिलासा देण्यासाठी एक स्वस्त योजना आणली आहे. या योजनेचा लाभ घेऊन तुम्ही फक्त 634 रुपयांमध्ये LPG गॅस सिलिंडरची बुकींग करू शकता.

या सिलिंडरचे नाव कम्पोजिट सिलिंडर असं असून हा सिलिंडर 14 किलोच्या सिलिंडरच्या वजनाच्या तुलनेत हलका आहे. या सिलिंडरमध्ये तुम्हाला 10 किलो एलपीजी गॅस मिळतो. वजनाने हलका असल्याने तुम्ही अगदी एका हाताने या सिलिंडरला उचलू शकता. थोडक्यात सांगायचं झाल्यास घरी वापरण्यात येणाऱ्या सिलिंडरच्या तुलनेत हा सिलिंडर 50 टक्क्यांनी हलका आहे.

दरम्यान, या सिलिंडरची विशेष बाब म्हणजे, यामध्ये किती गॅस शिल्लक हे देखील लवकर कळतं. याशिवाय हा सिलिंडर गंजत सुद्धा नाही. तसेच त्याचा स्फोट देखील होत नाही. अत्यंत पारदर्शक असा हा सिलिंडर बनवण्यात आला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.