Take a fresh look at your lifestyle.

LPG Cylinder : आता वाढत्या महागाईत गॅस सिलेंडर मोफत मिळवण्याची सुवर्णसंधी!

0

ओटीटी न्यूज नेटवर्क

मुंबई – सध्या वाढत्या महागाईमुळे नागरिक त्रस्त आहेत. अशातच, पेट्रोल डिझेल सारख्या इंधनांच्या गगनाला भिडलेल्या किंमती तसेच खाद्यतेलासह गॅस सिलेंडरचे वाढलेले दर यामुळे नागरिकांमध्ये नाराजीचा सूर पाहायला मिळतोय. जवळपास सध्या भारतातल्या सर्वच घरांमध्ये गॅसचा वापर होतो. दिवसेंदिवस गॅस वापरणाऱ्यांची ही संख्या वाढतच चालली आहे. त्यामुळे सिलेंडरच्या दरांतील झालेले बदल जाणून घेण्यासाठी नागरिक नेहमीच उत्सुक असतात.

दरम्यान, तेल कंपन्यांनी तब्बल पाच महिन्यांनंतर एलपीजी (LPG) गॅस सिलेंडरच्या किमतीत वाढ केली आहे. एकीकडे जीवनावश्यक वस्तूंसोबतच गॅस सिलेंडरच्या किंमतीत देखील मोठी वाढ होत असतानाच एक सुवर्णसंधी नागरिकांसाठी चालून आली आहे. कारण, या संधींद्वारे तुम्हाला चक्क मोफत सिलेंडर मिळवता येणार आहे.


ऑनलाइन पेमेंट प्लॅटफॉर्म पेटीएमने नुकतीच एक ऑफर लाँच केली आहे. ज्याद्वारे तुम्ही स्वस्त एलपीजी सिलेंडरचा लाभ घेऊ शकता. महत्वाचं म्हणजे, जर तुम्ही भाग्यवान असाल, तर तुम्हाला गॅस सिलिंडरसाठी एक रुपयाही खर्च करण्याची गरज नाही, म्हणजेच ते तुम्हाला मोफत मिळणार आहे.

दरम्यान, पेटीएमच्या या ऑफरचा लाभ घेताना, त्याच्याशी संबंधित सर्व नियम आणि अटी जाणून घेणे आणि समजून घेणे खूप महत्वाचे आहे.

Paytm नवीन वापरकर्त्यांसाठी आपल्या प्लॅटफॉर्मवरून LPG सिलिंडर बुक करण्यासाठी एक अतिशय फायदेशीर डील ऑफर करत आहे.

देशभरातील लाखो वापरकर्त्यांना LPG सिलिंडर बुक करायचे असेल तर पेटीएम वापरावे लागते. मिळालेल्या माहितीनुसार, पेटीएम वेळोवेळी अशा ऑफर्स आपल्या यूजर्ससाठी आणत असते.

फ्री कूपन कोड वापरा

विद्यमान पेटीएम वापरकर्त्यांना मोफत एलपीजी सिलिंडर मिळवण्याची संधी मिळत आहे. यासाठी, पेटीएम अॅपमध्ये पेमेंट प्रक्रिया पूर्ण करण्यापूर्वी त्यांनी फ्री कूपन कोड वापरणे आवश्यक आहे.

FIRSTCYLINDER प्रोमोकोड वापरावा लागेल

पेटीएमच्या मते, जर आपण या ऑफरमधील नवीन वापरकर्त्यांबद्दल बोललो, तर ते त्यांच्या पहिल्या बुकिंगवर 30 रुपयांच्या फ्लॅट कॅशबॅकचा लाभ घेऊ शकतात. यासाठी त्यांना पेटीएम अॅपवर पेमेंट करताना FIRSTCYLINDER प्रोमोकोड टाकावा लागेल. ही कॅशबॅक ऑफर सर्व 3 प्रमुख एलपीजी कंपन्यांच्या सिलिंडर बुकिंगवर लागू आहे – इंडेन, एचपी गॅस आणि भारत गॅस.

तुम्ही पे लेटर सुविधेचाही लाभ घेऊ शकता

ग्राहक Paytm च्या Book Now Pay Later सुविधेचाही सहज लाभ घेऊ शकतात. जर तुम्ही या सुविधेचा लाभ घेण्याचा विचार करत असाल तर तुम्हाला पुढील महिन्यात गॅस सिलिंडरच्या बुकिंगसाठी पैसे भरण्याचा पर्याय देण्यात आला आहे. म्हणजेच, जर तुम्ही सिलेंडर बुक करत असाल तर तुम्हाला त्याचे पैसे पुढील महिन्यात भरावे लागतील. या ऑफरबद्दल सांगायचे तर, तिन्ही गॅस कंपन्यांच्या ग्राहकांसाठी ही ऑफर लागू करण्यात आली आहे.

असे करा पेटीएम वर एलपीजी सिलेंडर बुक –

वापरकर्त्याने बुक गॅस सिलेंडर टॅबवर जावे.

गॅस प्रदाता निवडा.

मोबाईल नंबर/एलपीजी आयडी/ग्राहक क्रमांक प्रविष्ट करणे आवश्यक आहे.

तुमच्या पसंतीच्या पेमेंट मोडमध्ये पैसे द्या.

पेटीएम वॉलेट, पेटीएम यूपीआय, कार्ड आणि नेट बँकिंग वापरू शकता.

सिलिंडर नोंदणीकृत पत्त्यावर नजीकच्या गॅस एजन्सीवर पोहोचवावे लागतील.

Leave A Reply

Your email address will not be published.