Take a fresh look at your lifestyle.

लंपी : लसीकरणामुळे राज्यातील तब्बल नऊ हजार जनावरे ठणठणीत!

0

ओटीटी न्यूज नेटवर्क

मुंबई : जनावरांना होणाऱ्या लंपी त्वचारोगाचा फैलाव महाराष्ट्रातील ३० जिल्ह्यांमध्ये होऊन अनेक जनावरे मृत्युमुखी पडली होती. यामध्ये जळगांव, अकोला, पुणे, सातारा, अहमदनगर, बुलढाणा इत्यादी जिल्ह्यांमध्ये मृत जनावरांच्या आकड्याने शंभरी गाठली होती. हा आजार संसर्गजन्य असल्याने अतिशय वेगाने त्याचा फैलाव होतो. शासनाने हाती घेतलेल्या लसीकरण कार्यक्रमांतर्गत आतापर्यंत ५८ लक्ष १४ हजार जनावरांचे मोफत लसीकरण करण्यात आले आहे. त्यामुळे या विद्रुप व गंभीर आजारातून राज्यातील नऊ हजार पशुधन सुखरूप बचावले आहे.

राज्यातील एकूण पशुधनाची संख्या बघता २४ हजार ४६६ जनावरे लंपी बाधित झाली होती. ज्या पशुपालकांनी वेळीच जनावरांचे विलगीकरण, लसीकरण केले तसेच स्वच्छतेच्या निर्देशांचे पालन केले त्यांना आपले पशुधन वाचविण्यात यश प्राप्त झाले आहे.

गृहमंत्र्यांचा मोठा निर्णय; राज्यात लवकरच होणार २० हजार पोलिसांची भरती

राज्यातील १ हजार ७९६ गावांमध्ये लंपी संसर्ग झाला होता परिणामी ठोस उपाययोजना म्हणून शासनाने ८१ लक्ष ६२ हजार लसीकरण डोस उपलब्ध करून दिले आहे. दुर्दैवाची बाब म्हणजे अथक प्रयत्नानंतर राज्यातील ७९६ पशुधन या आजाराने मृत्युमुखी पडले आहे.

अनेक पशुपालकांनी सुरुवातीला निष्काळजीपणा केला तसेच वेळेत पशु वैद्यकीय तज्ज्ञांकडून मार्गदर्शन व उपचार घेण्यास टाळाटाळ केल्याने या आजाराचा अधिक संसर्ग झाला त्यामुळे जवळपास ८०० जनावरे मृत्युमुखी पडली. तरीसुद्धा सध्या पशुपालकांनी सतर्कतेने या आजारावर तातडीने जनावरांचे लसीकरण करून घ्यावे व वैद्यकीय दिशानिर्देशांचे पालन करावे असे आवाहन शासनाच्या पशुसंवर्धन विभागाद्वारे करण्यात येत आहे.

असेच सुपरफास्ट अपडेट मिळवण्याकरिता या लिंकवर क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.