Take a fresh look at your lifestyle.

राज्यावर आस्मानी संकट; मुख्यमंत्री शिंदेंसह आमदार-खासदार स्नेहभोजन पार्टीत व्यस्त !

0
maher

ओटीटी न्यूज नेटवर्क

मुंबई – गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात राजकीय नाट्य रंगलेलं पाहायला मिळालं. एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेविरुद्ध बंद पुकारले त्यानंतर उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रिपदावरून पायउतार व्हावे लागले. त्यानंतर, बंडखोर आमदार शिंदे यांनी भाजपच्या मदतीने सत्ता स्थापन करत मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. दरम्यान, एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदाचा पदभार स्विकारून 13 दिवस उलटले आहेत. मात्र, मंत्रिमंडळ विस्ताराचा मुहुर्त अजूनही लागलेला नाही.

मार्च 2022 पर्यंतचे संपूर्ण उद्दिष्ट पुढच्या सहा महिन्यात पूर्ण करा; उपमुख्यमंत्र्यांचे निर्देश

एकीकडे, या राजकीय नाट्याला एकप्रकारे पूर्णविराम लागल्याची चिन्हे असली तरी जनतेच्या अपेक्षा फोल ठरतांना दिसत आहेत. तर दुसरीकडे, राज्यभारत पावसाचा जोर वाढला आहे. अनेक भागात रेड अलर्ट देण्यात आला आहे. मात्र, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दिवसभर एनडीएच्या उमेदवाराच्या बैठकीत व्यस्त असल्याचे चित्र समोर आले आहे.

राज्यात मुंबईपासून ते नागपूरपर्यंत पावसाने धुमशान घातले आहे. कोकण, पश्चिम महाराष्ट्रात नद्या धोक्याच्या पातळी ओलांडत आहे. अशा परिस्थितीत मुंबईसह ठाणे, पुणे, सातारा आणि पालघरमध्ये रेड आणि यलो अलर्ट देण्यात आला आहे. खबरदारी म्हणून सर्व शाळांना सुट्टी देण्यात आली आहे. राज्यावर अस्मानी संकट आले असताना अजूनही मंत्र्यांचा पत्ता नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दोघेच राज्याच्या कारभाराचा गाडा हाकत आहे. मंत्रिमंडळाचा विस्तारच झाला नसल्यामुळे राज्याला कोणताही मंत्री अद्याप लाभलेला नाही.

मोठी बातमी – ‘या’ कारणामुळे पुण्यातील सर्व शाळा बंद करण्याचा निर्णय!

विशेष म्हणजे, राज्यावर अस्मानी संकट आले असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (cm eknath shinde) आणि उपमुख्यमंत्री हे राष्ट्रपतिपदाच्या (presidential election 2022) एनडीएच्या उमेदवार द्रोपदी मुर्मू (draupadi murmu) यांच्या बैठकीसाठी व्यस्त असणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.