m Parivahan App | ड्रायव्हिंग लायसन्स व RC सोबत नसेल तरीही दंड लागणार नाही, त्यासाठी करा हे काम

0

m Parivahan App : ड्रायव्हिंग लायसन्स (Driving License) सोबत न ठेवल्यास आतापर्यंत अनेकदा तुम्हाला कारवाईला सामोरे जावे लागले असेल. पोलिसांकडून तुमचे चलन कापले गेले असेल. कारण, ड्रायव्हिंग लायसन्स ड्रायव्हरकडे असणं अत्यंत गरजेचं असते. परंतु, आता अशी कारवाई तुमच्यावर होणार नाही. (driving license mparivahan)

 

केंद्र सरकारने एक महत्वाचा निर्णय घेतलेला आहे. ज्यामध्ये वाहन कायद्यात दुरुस्ती केली आहे. त्याच्या आधारे केंद्र सरकारने अधिसूचना काढली असून, त्यानुसार आता गाडी चालवताना ड्रायव्हिंग लायसन्स व आरसी बूक सोबत ठेवण्याची काहीही गरज नाही. mparivahan app ड्रायव्हिंग लायसन्स तुमच्याकडे नसले तरी कारवाई करता येणार नाही.

 

आपले ड्रायव्हिंग लायसन येथे डाऊनलोड करा

ड्रायव्हिंग लायसन्स तुमच्या खिशात नसले तरी तुम्ही ‘एम परिवहन’ या मोबाईल ॲपमध्ये ठेवू शकता. वाहतूक पोलिसांनी अडवल्यास अ‍ॅपवरुन तुम्हाला ड्रायव्हिंग लायसन्स पोलिसांना दाखवता येतील. यामुळे नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे. आता ड्रायव्हिंग लायसन्स m Parivahan ॲपमध्ये कसे ठेवायचे, याबाबतची माहिती जाणून घेऊ या..

 

ड्रायव्हिंग लायसन्स असे ठेवा मोबाईल ॲपवर

 

सर्वप्रथम Google Play Store वर जाऊन, m Parivahan ॲप डाऊनलोड करा.

आता मोबाईल नंबरच्या साइन इन करा. मोबाईलवर आलेला ओटीपी टाकून नोंदणी करा.

आता तुमच्यासमोर दोन पर्याय दिसतील एक म्हणजे ड्रायव्हिंग लायसन्स व दुसरा आरसी, यापैकी कोणताही एक निवडा.

 

तुमचा ड्रायव्हिंग लायसन्स नंबर टाका

 

व्हर्च्युअल ड्रायव्हिंग लायसन्स जनरेट करण्यासाठी Add to My Dashboard बटणावर क्लिक करा.

जन्मतारीख प्रविष्ट केल्यानंवर तुमचे ड्रायव्हिंग लायसन्स डॅशबोर्डमध्ये जोडल्या जाईल. (mparivahan app how to use)

 

ड्रायव्हिंग लायसन्स खिशात नसेल तर असा करा ॲपचा वापर

m Parivahan अ‍ॅपवर व्हर्च्युअल ड्रायव्हिंग लायसन्स पाहण्यासाठी डॅशबोर्डवर क्लिक करा. तुमच्यासमोर लायसन्स व क्यूआर कोडची संपूर्ण माहिती दिसेल. त्याचा वापर अधिकाऱ्यांकडून कागदपत्रांची सर्व आवश्यक माहिती स्कॅन करण्यासाठी केला जातो. स्कॅन केल्यानंतर वाहतूक पोलिसांना ड्रायव्हिंग लायसन्स व RC दिसून जाईल.

Leave A Reply

Your email address will not be published.