Take a fresh look at your lifestyle.

शेवटच्या षटकाचा व्हिडीओ पहाच! अखेरच्या चेंडूवर महेंद्रसिंग धोनीची मॅच फिनिशिंग खेळी; चेन्नईचा थरारक विजय

0
maher

ओटीटी न्यूज नेटवर्क

मुंबई – सध्या क्रिकेट आयपीएलचा १५ व सिझन जोरदार सुरु आहे. दरवर्षी दमदार स्टार खेळाडू असलेल्या मुंबई तसेच चेन्नई या दोन्ही टीम्सना यंदा खास कामगिरी करता आली नाही, ज्यामुळे यंदा या दोन टीम पॉईंट्स मध्ये बॉटम लाईनवर आहेत. मात्र, शुक्रवारी झालेल्या मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई सुपरकिंग्स या सामन्याने चित्र बदललं आहे असं म्हणायला हरकत नाही. अत्यंत चुरशीच्या झालेल्या कालच्या लढतीमध्ये शेवटच्या चेंडूपर्यंत गेलेल्या थरारक सामन्यात अखेर महेंद्रसिंह धोनीने (M S Dhoni) चौकार मारत चेन्नई सुपर किंग्सला (Chennai Super Kings) विजय मिळवून दिला आहे.

Trending Viral Video: नवरीच्या एन्ट्रीकडे नवरदेवाचं दुर्लक्ष, वधूला राग आल्यावर काय घडलं बघाच!

चेन्नईने मुंबई इंडियन्सवर (Mumbai Indians) 3 विकेट्सने विजय मिळवला आहे. धोनी चेन्नईचा विजयाचा हिरो ठरला. (mi vs csk ipl 2022 m s dhoni hit four on last bowl and chennai win sensetional match by 3 wickets against mumbai indians)
शेवटच्या चेंडूवर चेन्नईला विजयासाठी 4 धावांची गरज होती. ही खेळी पूर्ण करण्यासाठी धोनीने चौकार मारुन चेन्नईला विजय मिळवून दिला. चेन्नईचा हा या मोसमातील दुसरा विजय ठरला. तर मुंबईचा हा सलग सातवा पराभव झाला. यासह मुंबईचं या मोसमातील आव्हान संपुष्टात आलं.

IMPORTANT: तुमचं Pan Card वापरून इतर कोणी loan घेतलंय का? ‘या’ सोप्या पद्धतीने तपासा

मुंबई इंडिन्सने चेन्नई सुपर किंग्सला 156 धावांचे आव्हान दिले होते. चेन्नईकडून अंबाती रायडुने सर्वाधिक 40 धावांची खेळी केली. तर रॉबिन उथप्पाने 30 धावांचं योगदान दिलं. तसेच धोनीने निर्णायक क्षणी 28 धावांची नाबाद विजयी खेळी साकारली. तर प्रिटोरियसने नाबाद 22 धावा करत धोनीला चांगली साथ दिली.

मुंबईकडून डॅनियल सॅम्सने सर्वाधिक 4 विकेट्स घेतल्या. जयदेव उनाडकटने 2 तर रायली मेरेडिथने 1 विकेट घेतली. तर जसप्रीत बुमराह विकेट्स घेण्यात अपयशी ठरला.

त्याआधी चेन्नईने टॉस जिंकून मुंबईला बॅटिंगसाठी भाग पाडलं. तिलक वर्माच्या (Tilak Varma) झुंजार 51 धावांच्या जोरावर मुंबई इंडिन्सने चेन्नई सुपर किंग्सला 156 धावांचे आव्हान दिले. मुंबईने निर्धारित 20 ओव्हरमध्ये 7 विकेट्स गमावून 155 धावापर्यंत मजल मारली. मुंबईकडून तिलक वर्माने सर्वाधिक नाबाद 51 धावा केल्या.

संजय दत्तचा मृत्यू आणि त्याचा निर्मात्यांना होणारा मोठा फायदा; हे गणित माहिती आहे का?

सूर्यकुमार यादवने 32 धावांची खेळी केली. युवा ऋतिक शौकीनने 25 धावांचं योगदान दिलं. तर रोहित शर्मा आणि इशान किशन या दोघांनी घोर निराशा केली. रोहित आणि इशान या दोघांना भोपळाही फोडता आला नाही. तर डेवाल्ड ब्रेविसही 4 धावा करुन माघारी परतला.

चेन्नईकडून मुकेश चौधरीने सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या. ड्वेन ब्राव्होने दोघांना मैदानाबाहेरचा रस्ता दाखवला. मिचेल सॅंटनर आणि महेश तीक्ष्णा या दोघांनी प्रत्येकी 1 विकेट घेतली.

पंतप्रधानांची भेट घेऊन शरद पवारांनी ‘त्या’ तिघांचा केला करेक्ट कार्यक्रम! राज्याच्या राजकारणात खळबळ

मुंबई प्लेइंग इलेव्हन : रोहित शर्मा (कर्णधार), इशान किशन (विकेटकीपर), डेवाल्ड ब्रेविस, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, कायरन पोलार्ड, रायली मेरेडिथ, ऋतिक शौकीन, डेनियल सॅम्स, जसप्रीत बुमराह आणि जयदेव उनादकट.

सीएसकेचे अंतिम 11 शिलेदार : रवींद्र जडेजा (कॅप्टन), ऋतुराज गायकवाड, रॉबिन उथप्पा, अंबाती रायुडू, शिवम दुबे, एमएस धोनी, ड्वेन ब्रावो, ड्वेन प्रिटोरियस, मिचेल सँटनर, महीश तीक्षणा आणि मुकेश चौधरी.

तुमच्या जिल्ह्याच्या सुपरफास्ट अपडेट्ससाठी या लिंकवर क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.