Take a fresh look at your lifestyle.

“ मोदी स्वत: ‘या’ वर्षी पंतप्रधानपद सोडणार!” – नरेंद्र मोदींबद्दल मोठं भाकीत

0

ओटीटी न्यूज नेटवर्क

लखनौ – उत्तर प्रदेशमधील निवडणुकीनंतर महामंडलेश्वर स्वामी यतींद्र आनंद गिरि यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींबद्दल भविष्यवाणी केलीय. महामंडलेश्वरर स्वामी यतींद्र आनंद गिरि यांनी केलेल्या दाव्यानुसार ग्रह-नक्षत्रांच्या आधारे भविष्यवाणी केल्यास १२ वर्ष नरेंद्र मोदी देशाच्या पंतप्रधानपदी कायम राहतील. १२ वर्ष हे पद भूषवल्यानंतर मोदी दिल्लीच्या राजकारणापासून दूर जातील असंही महामंडलेश्वर स्वामी यतींद्र आनंद गिरींनी म्हटलंय. राष्ट्रवादाच्या नावाने पंतप्रधान मोदी स्वत: पद सोडतील आणि ही जबाबदारी एखाद्या योग्य व्यक्तीकडे सोपवतील, असं सूचक वक्तव्यही महामंडलेश्वर स्वामी यतींद्र आनंद गिरिंनी केलंय. त्यांनी योगी आदित्यनाथ हे मोदीनंतर पंतप्रधान होतील असं सांगितलं आहे.

“१२ वर्ष पद भूषवल्यानंतर मोदीजी स्वत: पद सोडतील. राष्ट्रवादाच्या नावाखाली देशाचा कारभार चांगल्या पद्धतीने चालवू शकतो अशा सक्षम व्यक्तीकडे मोदीजी पंतप्रधान पदाची जबाबदारी देतील. मोदी स्वत: राजकारणामधून संन्यास घेतील. या माध्यमातून ते एक आदर्श सर्वांसमोर ठेवतील ज्यामधून ते राजकीय इतिहास घडवतील,” असं महामंडलेश्वर स्वामी यतींद्र आनंद गिरि म्हणालेत.

गुजरातचे माजी मुख्यमंत्री असणारे नरेंद्र मोदी हे मे २०१४ पासून भारताचे पंतप्रधान आहेत. २०१९ साली झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये पुन्हा एकदा भारतीयांना मोदींच्या नेतृत्वाखाली लढणाऱ्या भाजपा आणि मित्र पक्षांच्या बाजूने कौल देत त्यांना दुसऱ्यांदा पंतप्रधान पदी विराजमान होण्याची संधी दिली. मात्र आता महामंडलेश्वर स्वामी यतींद्र आनंद गिरि यांच्या सांगण्यानुसार २०२४ च्या निवडणुकीनंतर पंतप्रधान झाल्यानंतरही मोदी दोन वर्षांमध्ये म्हणजेच २०२६ मध्ये राजकीय संन्यास घेतील.

 

Leave A Reply

Your email address will not be published.