Take a fresh look at your lifestyle.

वाहन चालकांसाठी मोठी बातमी, ‘या’ इंधनाच्या दरात तब्बल 7 ते 8 रुपयांची घट!

0
maher

ओटीटी न्यूज नेटवर्क

मुंबई – एकीकडे पेट्रोल आणि डिझेलच्या दरात (Petrol Diesel Price Hike) सातत्याने वाढ होत असताना दुसरीकडे वाहनधारकांना एक दिलासा देणारी बातमी समोर आली आहे. राज्य सरकारने (Maharashtra Government) सीएनजी गॅसवर वाहन चालवणाऱ्यांना मोठा दिलासा दिला आहे. सीएनजीवरील (CNG-PNG Price) मूल्यवर्धित कर म्हणजेच व्हॅटमध्ये 10 टक्क्यांनी कपात करण्यात आली आहे. त्यानुसार येत्या 1 एप्रिलपासून राज्यातील सीएनजीचे दर कमी होणार आहे.

असेच सुपरफास्ट अपडेट मिळवण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार (Deputy CM Ajit Pawar) यांनी काही दिवसांपूर्वी अर्थसंकल्पामध्ये (Budget Session 2022) यासंदर्भातील घोषणा केली होती. त्यानुसार सीएनजीवरील मूल्यवर्धित कराचा दर 13.5 टक्क्यांवरुन 3 टक्के इतका कमी केल्याची अधिसूचना शनिवारी जारी करण्यात आली आहे. या अधिसूचनेमध्ये सीएनजीवर 3 टक्के मूल्यवर्धित कर आकारला जाईल असे नमूद करण्यात आले आहे.

हेही वाचा – रेशन कार्ड धारकांसाठी खुशखबर, केंद्रातील मोदी सरकारने दिलं मोठं गिप्ट

येत्या 1 एप्रिलपासून म्हणजेच शुक्रवारपासून हे नवीन दर लागू होणार आहेत. सीएनजीचे (CNG-PNG) दर कमी झाल्याने याचा फायदा रिक्षा, टॅक्सी, प्रवासी वाहतूक करणाऱ्या चालकांना होईल. तसेच या सर्व वाहनांमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना देखील काही प्रमाणात दिलासा मिळेल. असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले आहे. त्याचप्रमाणे सीएनजीच्या दरात कपात झाल्याने प्रदूषण नियंत्रणास मदत होईल, असा विश्वास सुद्धा त्यांनी व्यक्त केला आहे.

हेही वाचा – खुशखबर! आता महिलांना मिळणार मोफत शिलाई मशीन, ‘असा’ करा अर्ज

दरम्यान, नोव्हेंबर महिन्यात केंद्र सरकारने (Central Government) पेट्रोल डिझेलवरचं उत्पादन शुल्क कमी केले होते. तेव्हापासून राज्यातही कर कमी करण्याची मागणी केली जात आहे. अर्थसंकल्पात नैसर्गिक वायूवरील कर 10 टक्के कमी करण्यात आला आहे. पण पेट्रोल डिझेलवरील (Petrol Diesel) करात कोणताही बदल झालेला नाही. त्यामुळे पेट्रोल-डिझेलच्या दरात कोणताही बदल झालेला नाही फक्त सीएनजी आणि पीएनजी स्वस्त होणार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.