Take a fresh look at your lifestyle.

शेततळ्यांवरील व्हिडीओसाठी फेमस असलेल्या जोडगोळीचा बुडून मृत्यू; दुर्घटनेमागील कहाणी उघड

0
maher

ओटीटी न्यूज नेटवर्क

अमरावती – तरुणाई मध्ये सध्या व्हिडीओ बनवण्याचं प्रचंड वेड आहे. वेगवेगळे व्हिडीओ तसेच फोटोज आणि सेल्फी घेऊन अनेकजण सोशल मिडीयावर ते शेअर करत असतात. सोशल मीडियाच्या माध्यमातून कित्येक जण एका रात्रीतून स्टार बनले. खरं तर या माध्यमांनी अनेकांना एक स्वतःची वेगळी ओळख निर्माण करुन दिली.

असेच सुपरफास्ट अपडेट मिळवण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

अनेकदा सेल्फीच्या नादात म्हणा किंवा व्हिडीओ बनवण्याच्या नादात जीव गमावल्याच्या बऱ्याचशा घटना आपल्या कानावर येत असतात . तसेच सोशल मीडियाच्या माध्यमातून देखील त्या समोर येतात. अशीच एक दुर्दैवी घटना अमरावती जिल्ह्यातुन समोर आली आहे. अमरावतीमधील अचलपूर तालुक्यातील कुष्टा गावात शेततळ्यात बुडून दोघांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना रविवारी सायंकाळी समोर आली होती. दरम्यान, या घटनेत १३ वर्षीय मुलीसह तरुणाला जीव गमवावा लागला.
आता या दुर्घटनेमागील कहाणी उघड झाली आहे. मृत तरुण आणि तरुणी शेततळ्यावर बसून दररोज व्हिडीओ बनवत असत. सोशल मीडियावर या दोघांचे चांगले फोल्लोवर्स देखील आहेत. मात्र इतरांचं मनोरंजन करणाऱ्या या दोघांना याच शेततळ्यावर जलसमाधी मिळाली आहे. अमरावतीमधील कुष्टा शेत शिवारात ही घटना घडली आहे.

काय आहे प्रकरण?

13 वर्षीय हर्षा वांगे ही मुलगी शेत शिवारातील शेततळ्यावर सेल्फी घेत होती. मात्र, पाय घसरून ती पाण्यात पडली आणि तळ्यात बुडाली. ती पडल्याचं लक्षात आल्यानंतर तिला वाचवण्यासाठी 25 वर्षांच्या बाजीलाल कासदेकर याने देखील उडी घेतली. मात्र दुर्दैवाने त्यावेळी शेततळ्यावर पन्नी लावलेली होती. ज्यामुळे त्यांना बाहेर येत आले नाही आणि दोघेही जीवाला मुकले.

सावधान! तुमच्याकडे 15 वर्षांपेक्षा जुने वाहन आहे? बसू शकतो मोठा आर्थिक फटका

पोलीस आणि बचाव पथकाच्या मदतीने दोघांचे मृतदेह बाहेर काढले गेले. त्यानंतर शवविच्छेदनाकरिता पोलिसांच्या मदतीने अचलपूर उपजिल्हा रुग्णालयात दोघांचेही मृतदेह पाठवण्यात आले आहेत.

शेततळ्यावरील व्हिडीओ

बाजीलाल हा सोशल मीडियावर अनेक व्हिडीओज बनवण्याचं काम करत होता.त्यातलाच एक “किस्सा नहीं, कहानी बन गई” हा त्याचा व्हिडीओ अखेरचा ठरला आहे. दररोज ज्या शेततळ्यावर बसून दोघंही व्हिडीओ करत होते, त्याच शेत तळ्यावर या जोडीचा मृत्यू झाला त्यामुळे फोटो आणि व्हिडीओ काढण्याच्या नादात जीवावर बेतेल असे कृत्य करू नका असं आवाहन पोलिस करत आहेत.

‘द काश्मीर फाईल्स’ सिनेमाविषयी भाजपने विधिमंडळ अधिवेशनात केली ‘ही’ मागणी

Leave A Reply

Your email address will not be published.