Take a fresh look at your lifestyle.

राज ठाकरेंची सभा संपताच अजित पवारांचा कडक इशारा, म्हणाले, ‘नो कॉम्प्रमाईज’

0
maher

ओटीटी न्यूज नेटवर्क

मुंबई : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी राज्यातील कायदा सुव्यवस्था बिघडणार नाही याची जबाबदारी आपल्या सर्वांची असल्याचं म्हटलं आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी औरंगाबादमध्ये घेतलेल्या सभेसंदर्भात विचारलं असता अजित पवार यांनी आजचा चागंला दिवस आहे.

या तीन तासात काय घडलं हे माहिती नसल्याचं म्हटलं आहे. अजित पवार यांनी महाराष्ट्र हे देशातील प्रगत राज्य असल्याचं म्हणत राज्यातील जनतेला कायदा सुव्यवस्था राखण्याचं आवाहन केलं आहे.

आजचा चांगला दिवस आहे. मला या तीन तासात काय झालं हे माहिती नाही. महाराष्ट्राच्या जनतेला एकचं आवाहन करेन की शेवटी आपलं महाराष्ट्र आहे. संपूर्ण देशात आपल्या राज्याकडे प्रगत राज्य म्हणून पाहिलं जातं. सर्वांनी एकोपा ठेवला पाहिजे, जातीय एकोपा ठेवला पाहिजे, असं अजित पवार यांनी म्हटलं आहे. कुठल्याही परिस्थिती कुठल्याही स्थितीत कायदा सुव्यवस्था बिघडणार नाही ही दक्षता घेणं सर्वांची जबाबदारी आहे, ती सर्वांनी पार पाडलीच, त्यामध्ये कोणतीही तडजोड केली जाणार नाही, असं उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले.

राज ठाकरेंचा ४ मे चा अल्टिमेटम
राज ठाकरे यांनी औरंगाबाद येथील सभेत बोलताना ४ मे पर्यंत मशिदीवरील भोंगे उतरवले नाहीत तर हनुमान चालिसा दुप्पट आवाजात लावण्याचं आवाहन केलं आहे. दुसरीकडे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्यातील जनतेला कायदा व सुव्यवस्था राखण्याचं आवाहन केलं आहे. महाराष्ट्र हे देशातील प्रगत राज्य असल्याचा दाखला देखील अजित पवार यांनी दिला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.