Take a fresh look at your lifestyle.

महाराष्ट्रातल्या 92 नगरपरिषदेच्या निवडणुकींचं बिगूल वाजलं!

0

ओटीटी न्यूज नेटवर्क

मुंबई – महाराष्ट्रासाठीची आत्ताची सर्वात मोठी बातमी समोर आली आहे. राज्यातल्या तब्बल 92 नगरपरिषद तसेच 4 नगरपंचायत निवडणुकीच्या कार्यक्रमाची घोषणा राज्य निवडणूक आयोगाने केली आहे. 18 ऑगस्टला या दिवशी हे मतदान होईल. तर 19 ऑगस्टला मतदानाची मतमोजणी होईल, अशी माहिती निवडणूक आयोगाकडून देण्यात आली आहे. मात्र, ओबीसींच्या राजकीय आरक्षणाचा तिढा अजूनही कायम आहे.त्यामुळे ओबीसींच्या आरक्षणाशिवाय या निवडणुका पार पडणार का? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

ब्रेकिंग; संजय राऊतांविरोधात कोर्टाकडून अटक वॉरंट जारी!

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका नेमक्या कधी घेतल्या जातील? असा मोठा प्रश्न अनेकांना होता. ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरुन या निवडणुकांचा मुद्दा प्रचंड गाजला होता. हा मुद्दा अजून सुटला नसला तरीही सुप्रीम कोर्टाने या निवडणुकांबाबत महत्त्वाचा आदेश दिलाआहे.

विशेष म्हणजे, येत्या आठ-पंधरा दिवसात निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्याच्या सूचना देखील यापूर्वी 17 मे रोजी कोर्टाने दिलया होत्या.त्यानंतर आता राज्य निवडणूक आयोगाने 92 नगरपरिषदा आणि 4 नगरपंचायचीच्या निवडणुकींचा कार्यक्रम जाहीर केल्याने या निवडणुका ऑगस्ट महिन्यात होतील. भर पावसात या निवडणूक होण्याची चिन्ह आहेत.

मोठी बातमी- उद्धव ठाकरे राष्ट्रपती पदासाठी द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा देणार?

निवडणूक आयोगाने 17 जिल्ह्यांमधील 92 नगरपरिषदा आणि 4 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीचा प्रत्यक्ष निवडणूक कार्यक्रम राबविण्याची घोषणा केली आहे. विशेष म्हणजे ज्या नगरपरिषदांसाठी निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे त्या भागात आजपासून आचारसंहिता लागू झाली आहे.

असेच सुपरफास्ट अपडेट मिळवण्यासाठी खालील लिंकला क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.