Take a fresh look at your lifestyle.

महाराष्ट्र-कर्नाटक सीमा वाद मिटणार? अमित शहा करणार मध्यस्थी?

0
maher

ओटीटी न्यूज नेटवर्क

मुंबई – महाराष्ट्र-कर्नाटक सीमा प्रश्नाबाबत न्यायप्रविष्ठ विषयाचा गेल्या कित्येक वर्षांपासून पाठपुरावा सुरु आहे.हा सीमावाद सोडवण्यासाठी तसेच मराठी भाषिक गावांचा महाराष्ट्रात समावेश करण्यासाठी शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि महाराष्ट्र एकीकरण समिती यांच्याकडून सातत्याने मागणी होत आहे. तसेच कर्नाटक सरकारकडून मराठी भाषिकांचा सुरू असलेला छळ याविरोधात आंदोलनही करण्यात येत आहेत.

गेल्या अनेक वर्षांपासून महाराष्ट्र आणि कर्नाटक यांच्यातील सीमावाद (Maharashtra Karnataka border dispute) सुरु आहे. हा वाद सुप्रीम कोर्टातही पोहोचला. यातील बेळगाव (Belgaon), कारवार (Karvar), निपाणी हा भाग महाराष्ट्रात यावा अशी मराठी बांधवांची मागणी आहे. गेल्या अनेक वर्षांपासून बेळगावसह सीमाभागातील मराठी बांधव महाराष्ट्रात सामील व्हावेत यासाठी सातत्याने लढा देत आहेत.

तसं बघितल्यास महाराष्ट्र-कर्नाटक सीमा आणि बेळगाव प्रश्न हा केवळ चर्चेपुरता मर्यादित वाद नसून महाराष्ट्राच्या अस्मितेचा विषय आहे. मात्र, कन्नड भाषिकांकडून या भागातील मराठी बांधवांवर सातत्याने अन्याय सुरू आहे. मात्र, महाराष्ट्र आणि कर्नाटकातील सीमावाद लवकरच मिटण्याची शक्यता आहे.

दरम्यान, हाती आलेल्या माहितीनुसार, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) मध्यस्थी करण्याची शक्यता आहे. आसाम आणि मेघालय या दोन राज्यांतही गेल्या 50 वर्षांपासून सीमावाद सुरू होता. या दोन राज्यांतील सीमावादावर अखेर तोडगा निघालेला आहे. काल (29 मार्च 2022) केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत आसाम (Assam) आणि मेघालय (Meghalaya) यांच्यातील सीमावादावर तोडगा काढण्यासाठी केलेल्या करारावर स्वाक्षरी झाल्या आहेत.

आसाम आणि मेघालय या राज्यांतील सीमावाद सोडवण्यासाठी एका समितीची स्थापना करण्यात आली होती. या समितीने ज्या शिफारसी केल्या होत्या त्यानुसार आसाम-मेघालय या राज्यांत एक करार करण्यात आला. या करारावर दोन्ही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनी स्वाक्षरी केल्या आहेत. हा वाद मिटल्यानंतर आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिसवा यांनी एक मोठं विधान केलं आहे.

आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिसवा यांनी म्हटलं, आसाम आणि मेघालय यांच्यात सामंजस्य कराराच्या धर्तीवर सीमावाद सोडवण्यात आला आहे. अशाचप्रकारे महाराष्ट्र आणि कर्नाटक यांच्यातील सीमावाद सोडवला जाऊ शकतो. म्हणजेच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी ज्या प्रकारे हा वाद सोडवण्यासाठी मध्यस्थी केली त्याप्रकारे महाराष्ट्र-कर्नाटकमधील वादही सोडवला जाण्याची दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.