Take a fresh look at your lifestyle.

ठाकरे सरकारचा खेळ संपला! एकनाथ शिंदे यांच्या गटाचं पत्र समोर, तब्बल ‘इतक्या’ आमदारांच्या सह्या

maher

ओटीटी न्यूज नेटवर्क

मुंबई – उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) सरकार अल्पमतामध्ये आल्याचं स्पष्ट झालंय. शिवसेनेचे नेते आणि मंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी विधानसभा उपाध्य़क्ष नरहरी झिरवाळ यांना पत्र लिहलंय. या पत्रामध्ये 34 आमदारांच्या सह्या आहेत. शिवसेनेच्या 55 पैकी 34 आमदारांच्या या पत्रावर सह्या असल्यानं बहुसंख्य आमदार हे शिंदे यांच्यासोबत आहेत, त्यामुळे ठाकरे सरकार आता अल्पमतामध्ये आलं आहे. विधानसभेतील बहुमतदासाठी आवश्यक असलेली 145 आमदारांची मॅजिक फिगर महाविकास आघाडी सरकारकडं नाही, हे आता स्पष्ट झाले आहे.

Important News – आदित्य ठाकरेंनी ट्विटरवरुन मंत्रिपदाचा उल्लेख हटवला!

शिवसेना विधिमंडळ मुख्य प्रतोद पदी शिवसेना आमदार भरत गोगावले यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सबब, श्री.सुनील प्रभू यांनी आजच्या आमदारांच्या बैठकीबद्दल काढलेले आदेश कायदेशीरदृष्ट्या अवैध आहेत, असं ट्वीट एकनाथ शिंदे यांनी केलं आहे.

शिवसेनेमध्ये (Shivsena) बंड झाल्यानंतर आता पक्षाने आमदारांवर कारवाईचा बडगा उगारायला सुरूवात केली आहे. काल शिवसेनेने एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांचं गटनेतेपद काढून घेतलं, यानंतर आता शिवसेनेचे प्रतोद सुनिल प्रभू (Sunil Prabhu) यांनी शंभूराज देसाई (Shambhuraj Desai) आणि महेश शिंदे (Mahesh Shinde) यांना नोटीस पाठवली आहे. आज संध्याकाळी 5 वाजता वर्षा निवासस्थानी शिवसेनेची बैठक बोलावण्यात आली आहे, या बैठकीला उपस्थित राहण्याचे आदेश या नोटीसमध्ये देण्यात आले आहेत.

भाजपला थेट सत्ता स्थापनेचा दावा करता येणार का? सत्ता स्थापनेसाठी करावी लागेल ही प्रक्रिया

शिंदे यांनी त्यानंतर झिरवाळ यांना नवं पत्र पाठवत सुनील प्रभू यांच्या नियुक्तील आव्हान दिलंय. सुनील प्रभू यांचा आदेश अवैध असून प्रतोदपदी भारत गोगावली यांची नियुक्ती केल्याचं शिंदे यांनी जाहीर केले आहे. शिंदे यांच्या या नव्य भूमिकेमुळे शिवसेनेतील ठाकरे विरूद्ध शिंदे संघर्ष तीव्र झाला आहे.

असेच सुपरफास्ट अपडेट मिळवण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

Comments are closed.