Take a fresh look at your lifestyle.

केवळ ‘या’ कारणामुळे फडणवीसांनी उपमुख्यमंत्रिपद स्वीकारलं; शरद पवार स्पष्टच बोलले

ओटीटी न्यूज नेटवर्क

मुंबई – कालचा दिवस हा केवळ महाराष्ट्रासाठीच नव्हे तर संपुर्ण देशासाठी महत्वाचा ठरला. गेल्या काही दिवसांपासून राज्यात जो सत्तासंघर्ष सुरू होता त्याला काल पूर्णविराम मिळाला.

दरम्यान, राज्याचे मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांनी शपथ घेतल्यानंतर आता राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांची प्रतिक्रिया समोर आली आहे. यावेळी, महाराष्ट्राच्या राजकारणात गेली पाच वर्षे नेतृत्व केलेल्या देवेंद्र फडणवीस यांना उपमुख्यमंत्री पदावर बसावं लागण हा मोठा धक्का असल्याचे म्हणत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी देवेंद्र फडणवीस यांना टोला लगावला. “फडणवीसांचा चेहरा सांगत होता, ते आनंदी दिसत नाहीत. उपमुख्यमंत्रिपदाची जबाबदारी त्यांनी आनंदी मनाने त्यांनी स्वीकारली नाही. RSS च्या संस्कारामुळे फडणवीसांनी उपमुख्यमंत्रिपद स्वीकारलं”, असं पवार म्हणाले. ते पुण्यात बोलत होते.

असेच सुपरफास्ट अपडेट मिळवण्यासाठी या लिंकला क्लिक करा

भाजपकडून आदेश आला की तो सर्वोच्च आदेश असतो. मग दिल्लीवरून असो अथवा नागपूरहून- तो पाळावाच लागतो. त्यामुळे फडणवीसांना तो पाळावा लागला. त्यांच्यासाठी तो मोठा झटका होता. एकनाथ शिंदे यांनी बंड करून आमदारांना आपल्या बाजूने केले हेच त्यांचं यश असल्याचे पवार म्हणाले आहेत. फडणवीस यांचा चेहराच नाराज असल्याचे सांगत होता. लोकांमधून निवडून आले असते तर फडणवीसांना शाबासकी दिली असती. भाजपने एकनाथ शिंदे यांना मदत करण्याची जी भूमिका आत्ता घेतली ती अडीच वर्षांपूर्वी घेतली असती तर गेल्या अडीच वर्षात घडले ते घडलेच नसते, असं पवार म्हणाले.

आता पीएम किसान योजनेचे पैसे घरपोच मिळणार; ‘ही’ आहे सरकारची खास योजना

पवारांचा फडणवीसांना टोला
नंबर दोनची जागा फडणवीसांनी आनंदाने स्वीकारली असं दिसत नाही. त्यांचा चेहरा सांगत होता, फडणवीस नाखुश होते. नागपूरमध्ये त्यांनी आरएसएसचे स्वयंसेवक म्हणून काम केलंय. तिथे जो आदेश येईल तो पाळावा लागतो. आरएसएसच्या संस्कारामुळे फडणवीसांनी हे स्वीकारलं, दुसरं काही कारण असू शकत नाही, असं पवार म्हणाले.

उद्धव ठाकरे एखाद्यावर विश्वास टाकल्यावर त्यांच्यावर पूर्णपणे जबाबदारी द्यायची, अशा स्वभावाचे आहेत. उद्धव ठाकरेंनी संघटनेची, विधिमंडळाची जबाबदारी पूर्णपणे एकनाथ शिंदे यांच्यावर दिली होती, त्याचा हा परिणाम आहे, असं शरद पवार म्हणाले


उद्धव ठाकरे यांनी ग्रेसफुली राजीनामा दिला. मोठया मनाने राजीनामा दिला. तसेच आमदारांना बाहेर नेणं हे पूर्व नियोजित असल्याचे पवार म्हणाले आहेत. शिवसेना संपुष्टात आली नाही आणि येणार नाही, असंही पवार म्हणाले.

Comments are closed.