Take a fresh look at your lifestyle.

महाराष्ट्राच्या राजकारणाला मिळणार नवं वळण; ‘या’ नेत्याचे युतीबाबत सुचक विधान

0

ओटीटी न्यूज नेटवर्क

मुंबई : शिंदे आणि फडणवीस सरकार स्थापन झाल्यानंतर मनसेची जवळीक वाढत आहे. आगामी निवडणुकीत शिंदे गट किंवा भाजपशी युती होणार असल्याची चर्चा आहे. खुद्द मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ‘डबे जोडण्याचे काम सुरू आहे’ असे सूचक विधान केले आहे. त्यामुळे तर्कवितर्कांना उधाण आले आहे.

शिंदे-फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळ बैठकीतील मोठे निर्णय; वाचा सविस्तर…

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज मनसे नेते आणि सरचिटणीस यांची महत्त्वाची बैठक बोलावली आहे. यावेळी राज ठाकरे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. आज पक्षाची अंतर्गत बैठक आहे. त्यामुळे आज कोणी काही बोलणार नाही. आज अंतर्गत बैठक आहे, इतका मसाला आज मिळणार नाही, पण डबे जोडण्याचे काम सुरू असल्याचे सूचक विधान राज ठाकरेंनी केले.

असेच सुपरफास्ट अपडेट मिळवण्याकरिता या लिंकवर क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.