Take a fresh look at your lifestyle.

दंगलीचा कट : राज्यातील सुरक्षेबाबतची बातमी, परराज्यातून येणाऱ्यांवर पोलिसांची करडी नजर

0
maher

ओटीटी नेटवर्क न्यूज

मुंबई – भोंग्यांवरुन राज्यात वातावरण तापलं असताना, परराज्यातून येऊन राज्यात दंगल घडवण्याचा प्लान (Riot plot) असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली आहे. त्यामुळे परराज्यातून येणाऱ्यांवर पोलिसांची करडी नजर आहे.

दंगल घडविण्याचा कट असल्याने यासाठी पोलिसांची अतिरिक्त कुमकही सज्ज आहे. तर भोंगे लावल्यास हनुमान चालिसा लावू यावर मनसे ठामच असल्याने मनसे नेत्यांचीही धरपकड सुरु आहे .

चिमुकल्याची पाण्यात उडी; बचावासाठी आई धावून आली अन्.., अंगावर काटा आणणारा VIDEO पाहाच

मशिदींमधून लाऊडस्पीकर न हटवल्यास आंदोलन सुरुच राहील, अशी धमकी राज ठाकरे यांनी दिली आहे. त्यामुळे मुंबई पोलीस सतर्क आहेत. शहरात कोणतीही अनुचित घटना घडू नये यासाठी पोलीस यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली आहे.

अनेक पोलीस अधिकाऱ्यांना मुख्यालयात स्टँडबायवर ठेवले आहेत. दरम्यान, मनसेच्या आंदोलनासंदर्भात आतापर्यंत शहरात एकूण 7 गुन्हे दाखल केल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

आता FASTag विसरा, मोदी सरकार सुरू करणार नवीन टोल सिस्टम

दरम्यान, मनसेचे नेते पुढील आठवडयात अयोध्येला आढावा घेण्यासाठी जाणार आहेत. येत्या 5 जूनला मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा अयोध्या दौरा असणार आहेत. भोंग्याविरुद्ध आंदोलनानंतर आता अयोध्या दौऱ्याची तयारी सुरु झाली आहे. या दौरावेळी शरयू नदीच्या काठी, मनसे शक्ती प्रदर्शन करण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. मुंबई, पुणे, नाशिक, ठाणे आणि राज्यातील इतर ठिकाणाहून मनसैनिक अयोध्यामध्ये दाखल होणार आहेत.

IPL 2022 : धोनी आऊट झाल्यानंतर विराटने दिली शिवी? Video होतोय Viral

Leave A Reply

Your email address will not be published.