Take a fresh look at your lifestyle.

Maharashtra SSC Result 2022 Live – अखेर दहावीचा निकाल जाहीर; 10वीच्या निकालातही मुलींचच वर्चस्व; निकाल बघा एका क्लिकवर

maher

ओटीटी न्यूज नेटवर्क

MSBSHSE 10th Result 2022 Live Updates – विद्यार्थ्यांना अनेक दिवसांपासून ज्या दहावीच्या निकालाची (SSC result) आतुरता लागली होती तो निकाल आज (१७ जून) जाहीर होत आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने (MSBSHSE) पत्रकार परिषद घेत या निकालाची घोषणा केली. यात मंडळाकडून विभागनिहाय निकालाची टक्केवारीचे तपशीलही जाहीर करण्यात आले.

रोहित पवारांकडून अदानींच्या गाडीचं सारथ्य; भाजप नेत्याचा टोला; म्हणाले “मोदींना लक्ष्य करणाऱ्या बगलबच्च्यांना…”

२०२० च्या तुलनेत २०२२ चा निकाल १.६४ टक्क्यांनी जास्त
दरवर्षी मागील वर्षाशी निकालाची तुलना होते. २०२१ मध्ये अंतर्गत मुल्यमापनाद्वारे निकाल घोषित करण्यात आला होता. त्यामुळे २०२० ची तुलना २०२२ शी केली असता २०२० च्या तुलनेत २०२२ चा निकाल १.६४ टक्क्यांनी जास्त आहे. २०२१ मध्ये हा निकाल ९९.९५ टक्के होता.

www.mahresult.nic.in

www.mahahsscboard.in

या लिंक्सवरून तुम्ही रिझल्ट तपासू शकता.

ऊन पावसाच्या खेळात महाराष्ट्र चिंतेत! पावसाने बहुतांश महाराष्ट्र व्यापूनही पेरण्या खोळंबल्या; महत्वाचे कारण समोर

– महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ

गेल्या वर्षी कोरोनामुळे दहावी आणि बारावीच्या परीक्षा रद्द करण्यात आल्या होत्या. त्यामुळे बारावीचा निकाल हा विशेष मूल्यांकन पद्धतीने लावण्यात आला होता. यामध्ये दहावी आणि अकरावीचे गुण मार्क्स देण्यात आले होते. मात्र यंदा कोरोनाचा प्रादुर्भाव नसल्यामुळे बोर्डाकडून ऑफलाईन परीक्षा घेण्याचा निर्णय घेण्यात आला. याला अनेक विद्यार्थ्यांनी रस्त्यावर उतरून विरोधही केला. तरीही परीक्षा ऑफलाईन घेण्यात आल्या. मात्र यंदाच्या निकालातही मुलींनीच बाजी मारली आहे.

‘ही’ नवी इलेक्ट्रॉनिक स्कूटर ठरतेय अनेकांची पहिली पसंत; काय आहे खास?

राज्यभरातून तब्बल 16,38,964 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. सर्व विभागीय मंडळातून नियमित विद्यार्थीनींचा निकाल 97.96 असून विद्यार्थ्यांचा निकाल 96.06 आहे. यंदाच्या निकालात विद्यार्थिनींचाच डंका आहे. त्यामुळे ऑफलाईन परीक्षा होऊनही मुलीच अव्वल ठरल्या आहेत.

Best offer – दररोज फक्त 178 रूपये वाचवा आणि घरी न्या New Maruti Alto 800

Comments are closed.