Take a fresh look at your lifestyle.

नळाद्वारे जलपुरवठा करण्यात महाराष्ट्र देशात अव्वलस्थानी

0

ओटीटी न्यूज नेटवर्क

मुंबई: जल (Water) म्हणजे जीवन (Life) व ते प्रत्येक व्यक्तीला मिळावे याकरिता जलवितरण प्रणाली सक्षमपणे राबविणे गरजेचे असते. नेमके याच बाबतीत महाराष्ट्र राज्य (Maharashtra State) अग्रेसर असल्याचे निष्पन्न झाले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी २०१९ साली स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधत ‘जल जीवन मोहीम – हर घर जल’ या सर्वसमावेशक प्रकल्पाच्या उद्दीष्टपुर्तीचे लक्ष्य ठेवले होते. या अंतर्गत वर्ष २०२४ पर्यंत देशातील प्रत्येक घरी नळाद्वारे जलपुरवठा करण्याचे धोरण देशभरात राबविण्यात येत आहे.

मोठी बातमी! UPSC ची मुख्य परीक्षा सप्टेंबरमध्ये; वेळापत्रक जाहीर

सध्या महाराष्ट्र राज्य नळाद्वारे जलपुरवठा करण्यात राज्यांच्या क्रमवारीत अव्वलस्थानी आहे. राज्यातील ग्रामीण भागातील (Rural Areas) १ कोटी २ लक्ष लोकांना नळाद्वारे जलपुरवठा करण्यात येत आहे. सध्याच्या आकडेवारीनुसार जल जीवन मिशन अंतर्गत ३७.१२ टक्के ग्रामीण भागातील घरांना नळजोडणी करण्यात आली आहे. जल पुरवठा करण्यासोबतच अन्य महत्त्वपूर्ण बाब म्हणजे जल चाचणी करिता प्रयोगशाळांची (Laboratory) उभारणी, सध्या जल प्रयोगशाळांच्या बाबतीत राज्य दुसऱ्या स्थानावर आहे. जल वितरणासोबत शुध्द पेयजल (Clean Drinking Water) मिळणे हा सर्वांचा प्राथमिक अधिकार आहे. नेमके याच बाबतीत राज्य प्रयत्नशील असल्याचे दिसून येत आहे.

यंदा गणेशोत्सवाचा शेवट होणार ‘गोड’; अंतिम ५ दिवसांत रात्री १२ पर्यंत स्पीकर वाजविण्यास परवानगी

राज्यातील ग्रामीण व शहरी भागातील ९२ टक्के शाळा व ९३ टक्के अंगणवाड्यांना नळजोडणी करण्यात आली असून ही समाधानकारक स्थिती आहे. पुढील टप्प्यातील लक्ष्य १०० टक्के असून, लवकरच येत्या १ ते २ वर्षात ते पूर्ण होईल अशी आशा करणे गैर ठरणार नाही. सध्याची माहिती ३१ जुलै रोजीच्या आकडेवारीनुसार असून, राज्यातील अनेक जिल्हे लवकरच नळजोडणीच्या बाबतीत लक्ष्यपूर्ती करतील, असा अंदाज वर्तविला जात आहे.

असेच सुपरफास्ट अपडेट मिळविण्याकरिता या लिंकवर क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.