Take a fresh look at your lifestyle.

Breaking News : विधानसभा अध्यक्षपदासाठी भाजपच्या या तरुण आमदाराला संधी

ओटीटी न्यूज नेटवर्क

मुंबई – Breaking News विधानसभा अध्यक्षपदासाठी (Vidhansabha Speaker) सत्तारूढ भाजपा-एकनाथ शिंदे गटाचा उमेदवार निश्चित झाला आहे. मुंबईतील कुलाबाचे भाजपा आमदार राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) यांना अध्यक्षपदासाठी उमेदवारी दिली आहे. रविवारी ही निवडणूक होणार आहे. सुमारे 170 आमदारांचा पाठिंबा नार्वेकरांना असेल असे मानले जात आहे. राहुल नार्वेकर हे 45 वर्षांचे असून अध्यक्षपदी निवड झाल्यास ते विधानसभेचे आजवरचे सर्वात तरूण अध्यक्ष असतील.

Video: नॅशनल रेकॉर्ड तोडत नीरज चोप्राचा भाला पुन्हा सुसाट; डायमंड लीगमध्ये जबरदस्त फेकी

शिंदे सरकारच्या बहुमत चाचणीपूर्वी (Floor Test) एकनाथ शिंदे सरकारची विधानसभेत परीक्षा होईल. रविवारी विधानसभा अध्यक्षांची निवडणूक होईल. याच निवडणुकीसाठी अर्ज भरण्याची मुदत शनिवारपर्यंत आहे. रविवारी अध्यक्षपदाची निवड झाल्यानंतर विश्वासदर्शक ठराव मांडला जाईल.

ठाकरेंना मोठा धक्का! सरकारमध्ये येताच फडणवीसांचा मोठा निर्णय

अध्यक्षपदाच्या निवडणुकीत सरकारनं बाजी मारली तर शिंदे सरकारचे विधानसभेतील बहुमत सिद्ध होईल. त्यानंतर विश्वासदर्शक ठराव ही औपचारिकता असेल. त्यामुळे शिंदे सरकारची खरी परीक्षा रविवारी होणार आहे. या सरकारला कोणत्याही परिस्थितीमध्ये विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक जिंकावी लागेल.

Comments are closed.