Take a fresh look at your lifestyle.

धोनी IPL मधून संन्यास घेणार? CSK च्या सीईओंनी दिली मोठी माहिती!

0
maher

ओटीटी न्यूज नेटवर्क

मुंबई – आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्ज संघाला चार वेळा चॅंम्पियन बनवून देणाऱ्या कॅप्टन कुलने अचानकपणे चेन्नईचं कर्णधारपद सोडलं. यंदाच्या आयपीएल हंगामाला अवघे काही तासचं शिल्लक असताना महेंद्रसिंग धोनीने संघाच्या कर्णधारपदाची धुरा सर रविंद्र जडेजाकडे सोपावली. धोनीने अचानक घेतलेल्या या निर्णयामुळे सर्वांनाच धक्का बसला.

दरम्यान आता धोनी आयपीएलमधून लवकरच निवृत्त होईल असा दावा अनेकांकडून केला जात आहे. त्यातच आता चेन्नई सुपरकिंग्ज संघाचे मुख्य कार्यकारी अधिकारी काशी विश्वनाथ यांनी धोनीच्या संन्यासाबाबत मोठं विधान केलंय. आयपीएल 2022 हा हंगाम धोनीचा शेवटचा हंगाम असेल का? असा प्रश्न काशी विश्वनाथन यांना विचारण्यात आला असता त्यांनी यावर मोठी प्रतिक्रिया दिली आहे.

धोनीचा संन्यास तसेच त्याने केलेला कर्णधारपदाचा त्याग याविषयी बोलताना काशी विश्वनाथन म्हणाले की, “धोनीचा हा शेवटचा हंगाम असेल, असं मला वाटत नाही. धोनी जोपर्यंत तंदुरुस्त आहे, तोपर्यंत तो पुढे जात राहील. मात्र धोनी काय विचार करतो, याबाबत मला माहिती नाही. आम्ही धोनीच्या निर्णयाचा नेहमीच आदर केलेला आहे. तो आमच्यासाठी शक्ती स्तंभ असून त्याचे हे स्थान कायम राहील,”

पुढे बोलताना काशी विश्वनाथन म्हणाले की, ‘धोनीने घेतलेल्या निर्णयावर माझा विश्वास आहे. धोनी मार्गदर्शक म्हणून संघासोबत कायम असेल, धोनीचा हा शेवटचा हंगाम नसेल, असं मला वाटतं,”

दरम्यान, धोनीच्या क्रिकेट संन्यासाबाबत अजूतरी कोणतीही अधिकृत माहिती आलेली नाही. आयपीएलच्या पंधराव्या हंगामात धोनी चेन्नई सुपर किंग्ज संघाकडून यष्टीरक्षक आणि फलंदाज म्हणून खेळणार असून त्याच्याकडे कर्णधारपद नसेल. त्यामुळे धोनीचा यंदाचा हंगाम हा शेवटचा आयपीएल हंगाम असेल का? हा प्रश्न अजूनही अनुत्तरीतच आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.