Take a fresh look at your lifestyle.

१९ सप्टेंबरला अभिनेत्री तेजस्विनी पंडित यांच्या उपस्थितीत माहेर कट्टा राज्यस्तरीय शुभारंभ; खासदार सुप्रियाताई सुळे यांचा ऑनलाईन सहभाग

0

ओटीटी न्यूज नेटवर्क

नागपूर : ऑन धिस टाईम मीडिया अंतर्गत निर्माण करण्यात आलेले महिलांचे हक्काचे व्यासपीठ ‘माहेर कट्टा’चा राज्यस्तरीय शुभारंभ सोमवार 19 सप्टेंबर रोजी दुपारी 12 वाजता खासदार सुप्रियाताई सुळे यांच्या हस्ते कविवर्य सुरेश भट सभागृहात होणार आहे. याच कार्यक्रमाचे औचित्य साधून सिने अभिनेत्री तेजस्विनी पंडित यांच्या हस्ते विविध क्षेत्रात कार्य करणाऱ्या राज्यातील 35 महिलांना युनिव्हर्स-ओटीटी ‘वुमन अचिव्हर्स अवॉर्ड’ देऊन सन्मानित करण्यात येणार आहे.

राज्यपाल भगत सिंग कोश्यारींनी उधळली मुख्यमंत्री एकनाथ शिंदेवर स्तुतीसुमने

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रुबी सोशल वेलफेअर सोसायटीच्या अध्यक्ष रुबिना पटेल राहतील. प्रमुख अतिथी म्हणून युनिव्हर्स महिला नागरी सहकारी पतसंस्थेच्या स्नेहा भरत धोटे, माधवबागचे चीफ इंप्रूव्हमेंट ऑफिसर डॉ. प्रवीण धाडीगांवकर उपस्थित राहतील. ऑन धिस टाईम मीडियाचे चेअरमन संदीप थोरात, व्यवस्थापकीय संचालक कांचन बिडवे, मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद आंबेकर यांचीही यावेळी उपस्थिती राहील. सदर कार्यक्रमात माहेर कट्टा सदस्यांना ओळखपत्राचे वितरण करण्यात येईल तसेच ‘माझं माहेर’ मासिकाचे प्रकाशन करण्यात येईल.

नागपूर दौऱ्यात राज ठाकरेंचा कार्यकर्त्यांना कानमंत्र

संपूर्ण कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण ऑन धिस टाईम मीडियाच्या यू-ट्यूब चॅनलवर तसेच फेसबुक पेजवर करण्यात येणार आहे. कार्यक्रमात प्रवेश विनामुल्य असून महिलांनी मोठ्या संख्येने कार्यक्रमाला उपस्थित राहावे, असे आवाहन ऑन धिस टाईम मीडिया व माहेर कट्टा परिवाराच्या वतीने करण्यात आले आहे.

असेच सुपरफास्ट अपडेट मिळवण्याकरिता या लिंकवर क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.