Take a fresh look at your lifestyle.

जात पडताळणी समितीचा मोठा निर्णय; समीर वानखेडे मुस्लिम नाही, क्लिन चिट

0

ओटीटी न्यूज नेटवर्क

मुंबई : एनसीबीचे माजी विभागीय संचालक समीर वानखेडे यांना जात पडताळणी समितीने क्लीन चिट दिली आहे. वानखेडे हे जन्माने मुस्लिम नाहीत, असे आदेशात म्हटले आहे. वानखेडे आणि त्याच्या वडिलांनी इस्लाम धर्म स्वीकारला हे सिद्ध झालेले नाही. मात्र समीर वानखेडे हे अनुसूचित जातीचे असल्याचे जात पडताळणी समितीने स्पष्ट केले आहे.

६२ हजार सदोष झेंडे जळगाव महापालिका परत पाठवणार

समीर वानखेडे यांचे जात प्रमाणपत्र बनावट असल्याचा आरोप राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी केला होता. याप्रकरणी मुंबई जिल्हा जात पडताळणी समितीने समीर वानखेडे यांच्या जात प्रमाणपत्राबाबत सुनावणी घेतली. मलिकांच्या आरोपानंतर वानखेडे आणि त्यांच्या नातेवाईकांकडून विविध कागदपत्रे सादर करण्यात आली होती. मलिकांनी वानखेडे यांच्या पहिल्या लग्नाचे फोटो आणि विवाह प्रमाणपत्रही आणले होते. तसेच हे प्रकरण केंद्रीय अनुसूचित जाती-जमाती आयोगापर्यंत पोहोचले होते.

असेच सुपरफास्ट अपडेट मिळवण्याकरिता या लिंकवर क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.