Take a fresh look at your lifestyle.

कर्जतला मराठा वधू-वर परिचय मेळाव्याचे आयोजन

0
maher

गणेश जेवरे, ओटीटी न्यूज नेटवर्क

कर्जत : आजच्या धकाधकीच्या जीवनात सकल मराठा समाजातील उपवर मुला मुलींच्या विवाह जुळविण्यासाठी प्राथमिक परिचयाची आणि संवादाची आवश्यकता आहे. अनेक युवकांच्या बाबतीत काही तोतया मध्यस्थांच्यामुळे फसवणुकीच्या घटनाही घडत आहेत. सध्याची निर्माण झालेली परिस्थिती पाहून कर्जत येथील सकल मराठा सोयरिक ग्रुपची काही युवकांनी सामाजिक बांधिलकी म्हणून स्थापना केली आहे. यामधून मराठी युवक व युवतींची मोफत विवाह जुळवण्याचा उपक्रम कर्जत तालुक्यामध्ये प्रथमच राबविण्यात येत आहे.

व्हाट्सअप ग्रुप वर फक्त बायोडाटा टाकून तो बायोडाटा सर्व पाहतील असे नाही, त्यासाठी कर्जत शहरात सकल मराठा समाज कर्जत व सकल मराठा सोयरीक ग्रुप अहमदनगर यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार (दि.२७) सकाळी १० वा. शिवपार्वती मंगल कार्यालय, कुळधरण रोड ,कर्जत येथे सकल मराठा वधू-वर थेट-भेट परीचय मेळाव्याचे आयोजन करण्यात आल्याची माहिती सकल मराठा समाजाचे कार्यकर्ते संपतराव नलावडे यांनी दिली.

या मेळाव्यात आपल्या समाजातील सर्व विवाहयोग्य मुलं आणि मुली तसेच पालक यांनी कुठलाही संकोच मनात न ठेवता उपस्थित राहायचे आहे. जेणेकरून आपण आपल्या समाजबांधवांना सोबत आणि योग्य त्या व्यक्तीसोबत विवाह संबंधी संवाद साधू शकतो. आपले मूळ गाव सोडून नोकरी-व्यवसायानिमित्त शहरात वास्तव्यासाठी असणाऱ्या मंडळींनी सुद्धा उपस्थित राहायचे आहे. कारण या कार्यक्रमाला शहरी आणि ग्रामीण भागातील आपले सर्व नातेवाईक आवर्जून उपस्थित राहणार आहेत. विवाहयोग्य वर-वधू आणि पालक यांनी आपली माहिती पत्र बायोडाटा किमान 10 झेरॉक्स जवळ ठेवायला पाहिजे.
नोंदणी ज्यांना शक्य आहे त्यांनी अगोदरच्या दिवशी नोंदणी केली तर नियोजन करायला सोयीचे होईल. नंतर सुद्धा नोंदणी चालूच राहील.

मेळाव्यात सहभाग घेण्यासाठी प्रा. बाळासाहेब धांडे, संपतराव नलावडे, उध्दवराव तनपुरे, जनार्दन मोढके, पांडूरंग दवणे, वैभव वांगडे, हरीभाऊ जगताप यांच्याशी संपर्क साधावा.

Leave A Reply

Your email address will not be published.