Take a fresh look at your lifestyle.

महाराष्ट्रात ‘मराठा आरक्षणा’चा तिढा कायम; शिंदे-फडणवीस सरकारनं उचललं मोठं पाऊल

0
maher

ओटीटी न्यूज नेटवर्क

मुंबई : गेल्या काही महिन्यांपासून महाराष्ट्रात मराठा आरक्षणाचा मुद्दा गाजत आहे. अजूनही महाराष्ट्रात मराठा आरक्षणाचा (Maratha Reservation) तिढा कायम आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी विविध कायदेशीर बाबी कठीण होत चाललंय. शिंदे-फडणवीस सरकारने हा तिढा सोडवण्यासाठी मोठे पाऊल उचलले आहे. राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली सहा सदस्यीय मंत्रिमंडळ उपसमिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मान्यता दिली आहे.

अखेर प्रतीक्षा संपली! ‘या’ दिवशी 5G सेवा होणार लाँच

या समितीत महसूल मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील, ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, बंदरे मंत्री दादा भुसे, राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई, उद्योगमंत्री उदय सामंत यांचा समावेश असेल. ही समिती मराठा समाजाच्या सामाजिक, शैक्षणिक आणि आर्थिक स्थितीबाबत राज्य मागासवर्ग आयोगाच्या अहवालातील शिफारशी आणि इतर अनुषंगिक बाबींवर कायदेशीर कार्यवाही करेल.

मुंबई महापालिका जिंकली; राणेंना हायकोर्टाचा दणका, ‘इतक्या’ लाखांचा ठोठावला दंड

त्यामुळे येत्या काळात मराठा आरक्षणाचा दरारा निवळण्याची शक्यता आहे. मराठा आरक्षणाबाबत आतापासून होणाऱ्या बैठकांमध्ये महत्त्वाचे निर्णय घेण्याचे अधिकार या समितीला असतील. या समितीच्या निर्णयावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे शिक्कामोर्तब करणार आहेत. मुख्यमंत्री कार्यालयाच्या अधिकृत ट्विटर अकाउंटवरून ही माहिती देण्यात आली आहे.

असेच सुपरफास्ट अपडेट मिळवण्याकरिता या लिंकवर क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.