Take a fresh look at your lifestyle.

Maruti Alto 2022 मोदी सरकारच्या या नव्या नियमामुळे Maruti Suzuki अडचणीत, Alto, WagonR, Celerio चं भविष्य अंधारात

maher

ओटीटी न्यूज नेटवर्क

नवी दिल्ली : Maruti Alto 2022 : मारुती सुझुकी ही भारतातली सर्वात मोठी वाहन उत्पादक कंपनी आहे. देशातल्या नागरिकांच्या छोट्या हॅचबॅक कार्सच्या मागणीकडे सर्वाधिक लक्ष देत या कंपनीने भारतीय वाहन बाजारावर कब्जा केला आहे. भारतात कमी किंमतीतल्या छोट्या हॅचबॅक कार्स सर्वात जास्त विकल्या जातात, या सेगमेंटवर मारुतीचं वर्चस्व आहे.

आज राज्यभरात ‘पेट्रोल-डिझेल नो परचेस’ आंदोलन; पेट्रोल पंपांवर वाहनांच्या मोठ्या रांगा

मारुतीच्या या सेगमेंटमध्ये सर्वात जास्त कार आहेत. मात्र मारुतीची सर्वात मोठी ताकद असलेल्या छोट्या आणि स्वस्त हॅचबॅक कार्सचं भविष्य सध्या अधांतरी आहे. केंद्र सरकारने प्रत्येक कारमध्ये ६ एअरबॅग्स देणे अनिवार्य केले आहे. त्यामुळे आता प्रत्येक वाहन उत्पादक कंपनीला त्यांच्या सर्व कारमध्ये ६ एअरबॅग्स द्याव्या लागतील. मात्र या नियमामुळे छोट्या कार बनवणाऱ्या मारुती सुझुकी कंपनीच्या चिंता वाढल्या आहेत.

आताची सर्वात मोठी बातमी! ‘या’ कारणाने आज महाराष्ट्रात पेट्रोल खरेदी बंद

मारुती सुझुकीची ऑल न्यू अल्टो यंदाच्या दिवाळीच्या आसपास लॉन्च होणार आहे. मात्र, लॉन्चिंगआधीच या कारशी संबंधित माहिती हळूहळू समोर येऊ लागली आहे. काही मीडिया रिपोर्ट्सनुसार ६ एअरबॅग्जच्या नियमामुळे मारुतीच्या एंट्री-लेव्हल कारचे भविष्य अनिश्चित आहे. अल्टोसह एस-प्रेसो (S-Presso), सेलेरिओ (Celerio) आणि वेगनआर (WagonR) या कारचे एंट्री लेव्हल व्हेरिएंटही अडचणीत येऊ शकतात. कारण केंद्र सरकारने अलीकडेच कारमध्ये ६ एअरबॅग देणं अनिवार्य केलं आहे. मारुती सुझुकीचे चेअरमन आर. सी. भार्गव यांनीही याबाबत चिंता व्यक्त केली आहे.

पोस्ट ऑफिसच्या ‘या’ तीन स्कीममध्ये पैसे गुंतवा आणि मिळवा मोठा परतावा

छोट्या कार्सना धक्का

इकॉनॉमिक टाईम्सशी संवाद साधताना भार्गव यांनी या नवीन कायद्यामुळे भारतातील छोट्या कारच्या भविष्याबाबत चिंता व्यक्त केली. भार्गव यांनी छोट्या कारमध्ये सहा एअरबॅग बसतील की नाही याबाबत चिंता व्यक्त केली आहे. ते म्हणाले की, “सर्व छोट्या कारमध्ये ६ एअरबॅग बसतील याबाबत खात्री देता येणार नाही. तसेच चार अतिरिक्त एअरबॅग वाढवल्याने कारच्या किमतीत लक्षणीय वाढ होईल आणि देशातील छोट्या कारच्या विक्रीला मोठा फटका बसेल.”

मान्सूनने दिली आनंदाची बातमी; या तारखेला महाराष्ट्रात आगमन होणार!

तब्बल इतका खर्च वाढणार

सध्या सर्व वाहनांमध्ये दोन एअरबॅग असणे आवश्यक आहे. यापैकी एक ड्रायव्हरसाठी आणि दुसरी ड्रायव्हरच्या शेजारी बसणाऱ्या प्रवाशांसाठी आहे. ड्रायव्हरसाठीची एअरबॅग जुलै २०१९ पासून अनिवार्य करण्यात आली होती, तर पुढच्या प्रवाशासाठीची एअरबॅग १ जानेवारी २०२२ पासून अनिवार्य करण्यात आली आहे. मारुती कंपनी आपल्या एंट्री-लेव्हल मॉडेलमध्ये चार एअरबॅग देण्यावर काम करत आहे. या एअरबॅग वाढवल्यानंतर कारची किंमत ६० हजार रुपयांनी वाढेल.

असेच सुपरफास्ट अपडेट मिळवण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

Comments are closed.