Take a fresh look at your lifestyle.

आता शानदार मारुती बॅलेनो आणि टोयोटा ग्लांझा CNG भारी किटसह येणार!

0
maher

ओटीटी न्यूज नेटवर्क

नवी दिल्ली – Maruti Baleno CNG And Toyota Glanza CNG वाढत्या महागाईमुळे आधीच सर्वसामान्य जनता त्रस्त आहे. अशातच इंधनाचे वाढते दर बघता भारतात सध्या सीएनजी वाहनांना मागणी वाढली आहे. मोठ्या प्रमाणात सीएनजी वाहनांची सध्या भारतात विक्री होत आहे. त्यामुळे अनेक वाहन उत्पादक कंपन्या फॅक्टरी फिटेड सीएनजी किटसह नवीनवीन कार्स लाँच करत आहेत.

नवीन कारसोबत तर फॅक्टरी फिटेड सीएनजी किट देण्यात येतेच पण आता बाजारात उपलब्ध असलेल्या आणि लोकप्रिय कार्समध्ये सीएनजी किट ऑफर करत आहेत. महिन्यात भारतात अजूनही काही कार सीएनजी किटसह लाँच होणार आहेत. मारुतीची न्यू जनरेशन मारुती अल्टो, मारुती बलेनो सीएनजी आणि टोयोटा ग्लान्झा सीएनजी या कार लाँच होणार आहेत.

बलेनो सीएनजी किटसह येणार

अद्याप कंपनीने बलेनो सीएनजी किटसह येणाऱ्या कारची लाँचिंग डेट जाहीर केलेली नाही. नवीन अल्टो कारमध्ये 1.0L K10C ड्युअलजेट इंजिन दिलं जाईल अशी शक्यता आहे. हे इंजिन ६७ बीएचपी पॉवर आणि ८९ न्युटन मीटर टॉर्क जनरेट करू शकेल. मीडियाच्या रिपोर्टनुसार, मारुती कंपनी नवीन अल्टो कारमध्ये तसेच बलेनोमध्ये सीएनजी व्हेरिएंटचा देखील समावेश करू शकते. येत्या काही महिन्यांमध्ये मारुतीची लोकप्रिय प्रीमियम हॅचबॅक कार बलेनोचं सीएनजी व्हेरिएंट लाँच करेल.

फॅक्टरी फिटेड सीएनजी किटसह टोयोटा ग्लान्झा लाँच होणार

दरम्यान, टोयोटो कंपनी देखील त्यांच्या ग्लान्झा कारचं सीएनजी व्हेरिएंट लाँचकरण्याची शक्यता आहे. ही कार १.२ लीटर डुअलजेट पेट्रोल इंजिनसह येते. मात्र आता फॅक्टरी फिटेड सीएनजी किट देखील मिळेल. ही कार गॅसोलीन युनिटसह ८९ पीएस पॉवर आणि ११३ न्युटन मीटर टॉर्क जनरेट करू शकेल. ही कार २२ किमी प्रति लीटर इतकं मायलेज देऊ शकते.

मायलेज

नवीन बलेनो आणि ग्लान्झा या दोन्ही कार्सचे सीएनजी व्हेरिएंट २५ किमी प्रति किलोच्या आसपास मायलेज देतील. पॉवर आणि टॉर्कचे आकडे रेग्युलर पेट्रोल कारपेक्षा थोडे कमी असतील. मात्र यात एक अडचण आहे. या दोन्ही कार्सचे सीएनजी मॉडेल केवळ मॅन्युअल गिअरबॉक्ससह येतील. यामध्ये ऑटोमॅटिक गिअरबॉक्सचा पर्याय मिळणार नाही. सीएनजी किट या कार्सच्या लोअर आणि मिड-स्पेक व्हेरिएंटमध्ये मिळेल.

Leave A Reply

Your email address will not be published.