Take a fresh look at your lifestyle.

ग्राहकांना मोठा झटका! एका रात्रीत बदलली Maruti Alto ची किंमत, ‘या’ ३ व्हेरियंट्सची विक्री झाली बंद; पाहा नव्या किंमती

बऱ्याचशा मध्यमवर्गीयांसाठी मारुती सुझुकीची अल्टो कार म्हणजे ड्रीम कार आहे. मारुती सुझुकीची सर्वात स्वस्त कार म्हणून देखील मारुती अल्टो नावाजलेली आहे.

0
maher

ओटीटी न्यूज नेटवर्क

नवी दिल्ली – बऱ्याचशा मध्यमवर्गीयांसाठी मारुती सुझुकीची अल्टो कार म्हणजे ड्रीम कार आहे. मारुती सुझुकीची सर्वात स्वस्त कार म्हणून देखील मारुती अल्टो नावाजलेली आहे. दरम्यान, याच Maruti Alto संदर्भात आत्ताची सर्वात मोठी बातमी समोर आली आहे. मारुती सुझुकीने आपल्या ग्राहकांना जोरदार झटका दिलाय. कारण कंपनीने आपल्या सर्वात स्वस्त हॅचबॅक मारुती सुझुकी ऑल्टोला(Maruti Alto) महाग केले आहे.

होम, ऑटो लोनसह इतर लोनही महाग; ‘या’ बँकांनी वाढवले तब्बल ‘इतके’ व्याजदर, तपासा नवीन दर

तब्बल ८ हजार रुपयांनी मारुतीने आपल्या ऑल्टोच्या किंमतीत वाढ केली आहे. महत्वाचं म्हणजे ऑल्टोच्या ३ व्हेरियंट्सची विक्री मारुतीने बंद केली आहे. आधी ऑल्टोची सुरुवातीची किंमत ३.२५ लाख रुपये होती. परंतु, आता STD आणि LXI व्हेरियंट्सच्या वाढलेल्या किंमतीनंतर मारुती सुझुकी ऑल्टोची सुरुवातीची दिल्ली एक्स शोरूम किंमत ४.०८ लाख रुपये झाली आहे. आज आम्ही तुम्हाला मारुती सुझुकी ऑल्टोच्या सर्व व्हेरियंट्सच्या नवीन आणि जुन्या किंमती संबंधी माहिती देत आहोत.

केवळ ‘या’ टिप्स फॉलो करा आणि त्वरित मिळवा Home Loan! कोणतीही बँक देणार नाही नकार

‘हे’ व्हेरियंट्स झाले बंद

सुरुवातीला मारुती(Maruti) आपल्या ऑल्टोच्या ७ व्हेरियंट्सची विक्री करीत होती. यात STD, LXI, LXI (O), VXI, VXI+, LXI CNG आणि LXI (O) CNG चा समावेश होता. मात्र, आता कंपनी याच्या केवळ ४ व्हेरियंट्सची विक्री करीत आहे. यात LXI (O), VXI, VXI+, आणि LXI (O) CNG चा समावेश आहे.

 

केवळ एकाच व्हेरियंट्मध्ये सीएनजीचा ऑप्शन

 

आधी मारुती सुझुकी ऑल्टोच्या सीएनजी कारचे दोन व्हेरियंट्स मध्ये येत होते. या ठिकाणी ग्राहकांना LXI CNG आणि LXI (O) LXI व्हेरियंट्सचा ऑप्शन मिळत होता. परंतु, आता ग्राहकांना केवळ मारुती सुझुकी ऑल्टो LXI (O) CNG व्हेरियंट्समध्ये सीएनजीचा ऑप्शन मिळेल.

 

अफलातून शतक, भन्नाट हॅट्रीक आणि एका विजयासह तीन संघांना धक्के; एकाच सामन्यात काय काय घडलं पाहा…

 

वर्षात दुसऱ्यांदा महाग झाली ऑल्टो((Maruti Alto)

याआधी मारुती सुझुकीने यावर्षी जानेवारी महिन्यात आपल्या ऑल्टोच्या किंमतीत वाढ केली होती. त्यावेळी कंपनीने ७ हजार रुपयांपासून ते १२ हजार रुपयांपर्यंत किंमतीत वाढ केली होती. त्यावेळी कंपनी सर्व ७ व्हेरियंट्सची विक्री करीत होती. जानेवारी महिन्यात कंपनीने ऑल्टोची सुरुवातीची किंमत ३.१५ लाख रुपयांऐवजी ३.२५ लाख रुपये केली होती.

 

इतकं देणार मायलेज

आल्टोचे(Maruti Alto) पेट्रोल मॉडल २२.०५ किमी प्रति लीटर आणि सीएनजी मॉल ३१.५९ किमी प्रति किलोग्रॅम पर्यंत मायलेज देते.

 

असेच सुपरफास्ट अपडेट मिळवण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.