Take a fresh look at your lifestyle.

म्हाडाच्या घरांच्या किमती कमी कराव्यात : आमदार कानडे

0

अनिल पांडे, ओटीटी न्यूज नेटवर्क

श्रीरामपूर : श्रीरामपूर शहारालगत असलेल्या म्हाडाच्या सदनिकेच्या किमीती कमी करुन गोरगरीब जनतेला दिलासा द्यावा अशी मागणी श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार लहू कानडे यांनी विधानसभेत उपस्थितीत करुन राज्याच्या गृहनिर्माण मंत्र्यांचे लक्ष वेधले आहे.

यावेळी आमदार कानडे म्हणाले की, श्रीरामपूर शहरालगत म्हाडाने जवळपास चौदाशे सदनिका बांधल्या. मात्र बाजारभावापेक्षा अधिक किंमती असल्याने गेल्या चार ते पाच वर्षापासून सदनिका आहे त्या स्थितीत पडून आहेत. परिसरातील स्थानिक बांधकाम व्यावसायिकांनी बांधलेल्या सदनिकांच्या दरापेक्षा म्हाडाने बांधलेल्या सदनिकांचे दर जास्त आहेत. त्यामुळे म्हाडाच्या सदनिका पडून आहेत. म्हाडाने सदनिकांचे दर कमी केल्यास सर्वसामान्य जनतेला हक्काचे घरे मिळण्याचा मार्ग मोकळा होईल. यापूर्वी देखील हा विषय म्हाडाकडे मांडला आहे. त्याकरीता गृहनिर्माण मंत्र्यांनी याबाबत निर्णय घ्यावा अशी मागणी आमदार कानडे यांनी सभागृहात मांडली.

सर्वसामान्य माणसाला आपल्या हक्काचे घर मिळावे यासाठी सरकार वेगवेगळ्या मोहीम राबवत आहे. म्हाडाने श्रीरामपूर येथे बांधलेल्या सदनिकांच्या किंमती कमी केल्यास सर्वसामान्य नागरिकांचे आपल्या हक्काच्या घरांचे स्वप्न साकार होईल असेही आमदार कानडे यांनी विधानसभेत बोलतांना आपली भूमिका मांडली.

श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघातील दहा हजार कुटूंबाला आपले हक्काचे घर मिळावे यासाठी रमाई आवास योजना, पंतप्रधान आवास योजना आशा महत्वपूर्ण योजना आमदार कानडे यशस्वीरीत्या राबवत आहे. यापूर्वी देखील आमदार कानडे यांनी विधानसभेत श्रीरामपूर-राहुरी विधानसभा मतदारसंघातील अनेक महत्त्वपूर्ण विषय आभ्यासपूर्वक मांडले आहेत. म्हाडाच्या सदनिकांच्या वाढीव किमतींचा विषय अनेक वर्षांपासून प्रलंबित होता. मात्र आता आमदारकानडे यांनी सदरचा विषय शासन दरबारी मांडल्याने म्हाडाच्या घरांच्या किमती कमी होतील अशी आशा पल्लवित झाली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.