Take a fresh look at your lifestyle.

तुमची गाय किंवा म्हैस कमी दुध देते का? फक्त ‘हे’ उपाय करा आणि वाढवा दुध उत्पादन क्षमता

0
maher

ओटीटी न्यूज नेटवर्क

भारतात सर्वात जास्त पशुपालन हे दूध उत्पादनासाठी केलं जातं. शेती सारख्या व्यवसायाला पूरक जोडधंदा म्हणून पशुपालन महत्वाचं आहे. पशुपालन करताना जनावरांची खास करून दुभत्या जनावरांची देखभाल करणं गरजेचं असत. ज्यामुळे त्यांच्या दुधाचं प्रमाण चांगलं राहत. अनेक शेतकरी किंवा दूध व्यास करणारे नागरिक दुधाचे उत्पादन वाढवण्यासाठी तसेच दुभत्या जनावरांची दूध देण्याची क्षमता वाढावी यासाठी प्रयत्नशील असतात. आज आपण अशाच काही उपाय योजनांविषयी चर्चा करणार आहोत ज्यांद्वारे जनावरांची दूध देण्याची क्षमता वाढणार आहे. त्यासाठी तुम्हाला कशा पद्धतीचे नियोजन करावे लागेल हे पाहूया.

थेट मुलाखतीद्वारे मिळवा ‘या’ जिल्ह्यात नोकरीची संधी; असा करा अर्ज

जर आपण देखील पशुपालन (Animal Husbandry) करत असाल आणि आपणांस आपल्या पशूंच्या दूध उत्पादन क्षमतेत वाढ करायची असेल तर त्यासाठी
शेतीमध्ये ज्या पद्धतीने नियोजन करून पिकांची पेरणी ते काढणीपर्यंतचा प्रवास गाठावा लागतो अगदी त्याच पद्धतीने पशुपालन व्यवसायातून देखील दूध उत्पादन वाढवण्यासाठी नियोजन पद्धतीने काम करावे लागणार आहे.

अशा पद्धतीने वाढेल पशूची दूध उत्पादन क्षमता

जेव्हा गाय किंवा म्हैसच्या प्रसूतीसाठी एक महिना शिल्लक राहील तेव्हा त्या जनावराला 10 मि.ली. 25 दिवस दररोज Adder-H द्या म्हणजे त्याच्या शरीरात काही विकार असल्यास ते बरे होतील. जर पशूच्या शरीरात कुठलाच विकार नसेल तर ते पशु सदृढ बनेल आणि दुधाच्या उत्पादनात देखील वाढ होईल. जनावराच्या प्रसूतीसाठी सुमारे 15 दिवस शिल्लक राहिले की त्या जनावराला दररोज 100 ग्रॅम एनबूस्ट पावडर खाऊ घालावे जेणेकरून जनावराच्या बाळाच्या विकासासाठी याचा फायदा होईल तसेच पुढील वेताला अधिक दूध देण्यास पुरेशी ऊर्जा त्या जनावराला मिळेल.

पंतप्रधानांची भेट घेऊन शरद पवारांनी ‘त्या’ तिघांचा केला करेक्ट कार्यक्रम! राज्याच्या राजकारणात खळबळ

प्रसूती झाल्यानंतर त्या दिवसापासून, आपण 100 मिली यूट्राविन जनावरांना 10 दिवसांसाठी द्यावे जेणेकरुन जनावर पूर्णपणे फलित होईल किंवा आपण त्याला पूर्णपणे जार टाकेल असं म्हणू आणि यामुळे गर्भाशय देखील योग्य प्रकारे स्वच्छ होईल. तसेच या दिवसापासून आठवडाभर 100 ग्रॅम एनबूस्ट पावडर सकाळ संध्याकाळ त्या जनावराला खायला द्या.

जनावर प्रसूत झाल्याच्या सात दिवसांनंतर, आतड्यातील जंत Minworm 90ml किंवा Minfluc-DS बोलसने मारून टाकले जातात आणि Enerboost पावडर 100g दररोज 21 दिवसांसाठी घ्या.

आता बँक खात्यात पैसे नसतील तरी काढता येतील 10,000 रुपये; जाणून घ्या सरकारची नवीन योजना

जनावर प्रसूत झाल्याच्या 11 व्या दिवसापासून, त्या जनावराला डिझामॅक्स फोर्टे बोलस 2 सकाळी, 2 संध्याकाळी आणि सिमलाज बोलस सकाळी एक संध्याकाळी एक या प्रमाणात 10 दिवस खायला द्या यामुळे जनावराच्या दूध उत्पादन क्षमतेत वाढ होईल.

जनावर प्रसूत झाल्यानंतर एक महिन्यापासून दररोज 50 ग्रॅम बायोबिओन-गोल्ड पावडर खायला द्या जेणेकरुन जनावरांच्या दूध उत्पादनात वाढ होईल. याशिवाय असं केल्यास जनावर वेळेवर गर्भधारणा धारण करेल. जर तुम्ही या पद्धतींचे अनुसरन केले तर म्हशी तब्बल 20 ते 25 लिटर पर्यंत दूध देण्यास सक्षम बनतील आणि दरवर्षी सदर जनावर पारडूला जन्म देतील.

Leave A Reply

Your email address will not be published.