Take a fresh look at your lifestyle.

दूध-दह्याचे दर वाढण्याची शक्यता; ‘ही’ कंपनी मोठा निर्णय घेणार!

0
maher

ओटीटी न्यूज नेटवर्क

मुंबई : एकीकडे दिवसेंदिवस महागाई वाढत चालली आहे. सणासुदीच्या पूर्वसंध्येला जीवनावश्यक वस्तूंच्या किमतीही वाढल्या आहेत. दुधाचे दर आधीच वाढले आहेत. त्यामुळे दुधाच्या दरात पुन्हा एकदा वाढ होण्याची शक्यता आहे. वाढत्या महागाईमुळे दूध आणि दह्याचे दर वाढण्याची शक्यता आहे. दुग्धजन्य पदार्थांची विक्री करणाऱ्या मदर डेअरी कंपनीने दुग्धजन्य पदार्थांचे दर वाढविण्याचा विचार केला आहे. याबाबत कंपनीच्या अधिकाऱ्यांनी तसे संकेत दिले आहेत.

विप्रो कंपनीने तब्बल 300 कर्मचाऱ्यांना दिलं ‘नारळ’; शेअर बाजारात त्सुनामी येणार?

चालू आर्थिक वर्षात मदर डेअरीच्या उत्पादनांच्या किमतीत 20 टक्के वाढ होण्याची शक्यता आहे. यामागचे कारणही कंपनीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. मदर डेअरीची उलाढाल 15 हजार कोटी रुपयांपर्यंत पोहोचू शकते. याशिवाय मदर डेअरने फळे आणि भाजीपाला क्षेत्रातही प्रवेश केला आहे. त्यामुळे तेथील किमतींवर याचा काय परिणाम होईल हे पाहणे महत्त्वाचे आहे.

देवेंद्र फडणवीसांचे उद्धव ठाकरेंना जोरदार प्रत्युत्तर; महाविकास आघाडी नेत्यांवर सूचक विधान

अलीकडे दूध आणि दह्याचे दर वाढले होते. डिझेलच्या दरात वाढ झाल्यामुळे दुधाच्या दरातही वाढ झाल्याचे कंपनीने म्हटले आहे. या दरवाढीचा शेतकऱ्यांना फायदा होत असल्याचा दावा कंपनीने केला आहे. मदर डेअरीचे व्यवस्थापकीय संचालक मनीष बंदलीश विक्री वाढीबद्दल सांगतात की, चालू आर्थिक वर्षात दूध आणि दुग्धजन्य पदार्थांची मागणी 15 टक्क्यांहून अधिक वाढत आहे. याचा फायदा मदर डेअरीला झाला.

उद्धव ठाकरेंच्या भेटीसाठी गौतम अदानी ‘मातोश्री’वर; राजकीय चर्चांना उधाण

मदर डेअरीचा 70 टक्के व्यवसाय फक्त दूध आणि दुग्धजन्य पदार्थांचा आहे. कोरोनामुळे त्याचा व्यवसाय ठप्प झाल्याने या वर्षी आईस्क्रीमच्या विक्रीलाही बंपर मिळण्याची अपेक्षा आहे. मदर डेअरी उत्पादनांच्या किमती किती वाढणार आणि त्याची अंमलबजावणी कधीपासून होणार, याची चिंता ग्राहकांना लागली आहे.

असेच सुपरफास्ट अपडेट मिळवण्याकरिता या लिंकवर क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.