Mini Tractor Subsidy : 90 टक्के अनुदानावर मिनी ट्रॅक्टर अर्ज सुरु

0

0Mini Tractor Subsidy : आज आपण समाज कल्याण विभागाकडून 90 टक्के अनुदानावर मिळणाऱ्या मिनी ट्रॅक्टर योजने बद्दल जाणून घेणार आहोत. वेळोवेळी जिल्हा परिषद व समाज कल्याण विभागाकडून नागरिकांसाठी विविध योजना राबविल्या जातात. परंतु नागरिकांना त्याची माहिती मिळत नाही. 

Mini Tractor Subsidy At 90 %

लातूर जिल्ह्यातील अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकातील स्वयंसहायता बचत गटांना 90 टक्के अनुदानावर मिनी ट्रॅक्टर साठी अर्ज सुरू झाले आहेत. आपल्या जिल्ह्यातील अर्ज ज्या वेळेस होतील त्यावेळेस त्याची माहिती आम्ही प्रकाशित करत राहू.

 

लातूर जिल्ह्यातील मिनी ट्रॅक्टर साठी हे अर्ज 15 जानेवारी 2023  अर्ज पर्यंत स्वीकारले जाणार आहेत. त्याच्यासाठी असणाऱ्या अटी-शर्ती अनुदाना बद्दल माहिती घेणार आहोत.

अर्ज करण्यसाठी येथे क्लिक करा

समाज कल्याण विभागाच्या माध्यमातून राज्यातील अनुसूचित जाती नवबौद्ध घटकातील बांधवांकडे विविध योजना राबवल्या जातात.

 

ही योजना अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या बचत गटासाठी आहे. त्याच्यामध्ये 80 टक्के सदस्य अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकातील असतील अशा बचत गटांना 90 टक्के अनुदानावर मिनी ट्रॅक्टर साठी अर्ज करता येतो.

जास्तीत जास्त अनुदान 3  लाख 15  हजार रुपये पर्यंत दिले जाते. यामध्ये अनुदानाची रक्कम की अर्ज केल्यानंतर निवड झाल्यावर ट्रॅक्टर खरेदीसाठी 50 टक्के रक्कम व आरटीओ पासिंग RTO Passing झाल्यानंतर उर्वरित 50 टक्के रक्कम दिले जाते.

अर्ज करण्यसाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.