Take a fresh look at your lifestyle.

ST Strike : अनिल परब यांनी एसटी कर्मचाऱ्यांना आवाहन करत केली मोठी घोषणा

0

ओटीटी न्यूज नेटवर्क

मुंबई – दिवाळीपासून सुरू झालेल्या एसटी कर्मचाऱ्यांच्या संपावर (ST employees strike) अद्यापही तोडगा निघाला नाही. तीन महिन्यांपासून राज्य सरकार (Maharashtra government) आणि एसटी संपकरी यांच्यात कित्येक चर्चा पार पडल्या. पण यातून संपकऱ्यांच्या काही मागण्या मान्य न झाल्याने संपकरी अजुनही आपल्या भुमिकेवर ठाम आहेत. दरम्यान आज परिवहन मंत्री अनिल परब (minister Anil Parab) यांनी एसटी कर्मचाऱ्यांना कामावर रुजू होण्याचे आवाहन करत शेवटचा इशारा दिला आहे.

असेच सुपरफास्ट अपडेट मिळवण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

अनिल परब म्हणाले की, संपकरी एस.टी. कर्मचाऱ्यांवर (ST employees) आमचा कोणताही राग नाही किंवा कोणताही आकस नाही. हे कर्मचारी वेगवेगळ्या आवाहनाला बळी पडले आहेत. त्यांच्या मनात गैरसमज पसरविले जात आहेत. मात्र आता संपकरी कर्मचाऱ्यांनी (msrtc employees) 31 मार्च 2022 पर्यंत  कामावर रुजू व्हावे, कामावर रुजू होण्याचा हा अखेरचा पर्याय आणि शेवटचा इशारा असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे.

हेही वाचा – धक्कादायक! स्कूल बसमध्ये दारू पिऊन विद्यार्थिनींचा धिंगाणा, व्हिडिओ व्हायरल

गेल्या अनेक महिन्यांपासून एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरु आहे. या संपाबाबत अधिवेशन कालावधीमध्ये (Maharashtra Budget Session 2022) शासनाची भूमिका सभागृहात मांडण्याबाबतच्या सूचना दोन्ही सभागृहातील सभापती आणि अध्यक्ष यांनी दिल्या होत्या. याबाबत परिवहन मंत्री ॲड. अनिल परब, यांनी आज दोन्ही सभागृहात निवेदन केले.

पगारवाढीबाबतही दिली माहिती

हेही वाचा – ‘तुम्हाला सत्ताच हवीय ना, मी येतो तुमच्यासोबत पण…’, मुख्यमंत्र्यांची भाजपला थेट ऑफर!

यावेळी परब यांनी महामंडळाने एसटी कर्मचाऱ्यांच्या बाजूने घेतलेल्या निर्णयांची माहिती दिली. एसटी कर्मचाऱ्यांना राज्य शासनाच्या कर्मचाऱ्यांप्रमाणे महागाई भत्ता 12 टक्क्यावरून 28% करण्यात आला, घरभाडे भत्ता 7%, 14% 21% वरुन 8%, 16% आणि 24% टक्के करण्यात आला. तसेच कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतनामध्ये सेवाकालावधीनुसार रुपये 5000, रुपये 4000 व रुपये 2500 अशी वाढ करण्यात आली असल्याचं त्यांनी सांगितलं आहे.

हेही वाचा – धोक्याची घंटा! भारतातील तब्बल सात राज्यांमध्ये सापडले, कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटचे रुग्ण

पगार महिन्याच्या 10 तारखेच्या आत होणार

दरम्यान, एसटी कर्मचाऱ्यांच्या वेतनामध्ये साधारणत: रुपये 7000 ते 9000 रुपये वाढ झाली आहे व महामंडळावर दरमहा रुपये 63 कोटीपेक्षा जादा भार पडला आहे. ही पगारवाढ सातव्या वेतन आयोगाच्या जवळपास आहे. त्यांच्या नोकरीची हमी आणि त्यांचा पगार महिन्याच्या 10 तारखेच्या आत देण्याची राज्य सरकारने घेतली असल्याची माहितीही मंत्री, ॲड. परब यांनी सभागृहाला दिली.

Leave A Reply

Your email address will not be published.