Take a fresh look at your lifestyle.

अल्पसंख्यांक विभागाकडून राहुरीला १ कोटीचा निधी मंजूर

0
maher

सुनील रासने, ओटीटी न्यूज नेटवर्क

राहुरी : राज्यातील अल्पसंख्याक बहुल ग्रामीण क्षेत्रात मुलभुत पायाभुत सुविधा अंतर्गत मुस्लीम समाजाच्या विकासासाठी राहुरी विधानसभा मतदार संघातील 8 गावांकरीता मुस्लीम कब्रस्थान विकसीत करण्यासाठी 1 कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला असल्याची माहिती उर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी दिली.

राज्याचे अल्पसंख्याक मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्याकडे मंत्री तनपुरे यांनी सातत्याने पाठपुरावा करत मंजुरी प्राप्त करुन घेतली. यामध्ये चिखलठाण – 10 लाख, मोमीन आखाडा – 10 लाख, नगर तालुक्यातील जेऊर 20 लाख , पाथर्डी तालुक्यातील तिसगांव 20 लाख, राहुरी खर्द 10 लाख, मानोरी 10 लाख , गुहा 10 लाख, कानडगांव 10 लाख असे एकुण 1 कोटी रुपयांचा निधी प्राप्त झाला असल्याचे मंत्री तनपुरे यांनी सांगितले. गेल्या 2 वर्षापासून कोरोना संक्रमणामुळे अनेक प्रस्तावित कामे प्रलंबीत राहिली होती. आता हळुहळु करोनाचा प्राद्रुर्भाव कमी झाल्याने महविकास आघाडी सरकारने निधी प्राप्त करुन दिला असल्याचे त्यांनी सांगितले. मतदार संघातील अनेक प्रलंबीत प्रस्ताव मंजुरीच्या प्रतिक्षेत आहेत. लवकरच त्याही कांमाना अग्रक्रमाने मंजुरी मिळणार असल्याचे मंत्री तनपुरे यांनी सांगतले. मतदार संघाच्या विकासासाठी आपण कायम प्रयत्नशील असून विकासाचा वाढता वेग ठेवला जाणार असल्याचे स्पष्ट केले.

Leave A Reply

Your email address will not be published.