Take a fresh look at your lifestyle.

एकनाथ शिंदेंच्या गटात मतभेद, स्वतः उद्धव ठाकरेंनीच दिली माहिती

maher

ओटीटी न्यूज नेटवर्क

मुंबई – राज्याच्या राजकारणात सध्या मोठ्या घडामोडी घडताना दिसत आहेत. अशातच, शिवसेनेचे एकनाथ शिंदे (eknath shinde) यांनी आघाडी सरकारला धक्का देत आपल्याच पक्षाविरुद्ध बंड पुकारले आहे. या बंडामुळे महाविकास आघाडीची गोची झाली आहे असं म्हणता येईल. सध्याच्या माहितीनुसार आता एकनाथ शिंदे हे आपल्यासोबत ५० आमदार असल्याचा दावा करत आहेत. मात्र, खुद्द शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीच महत्वाची माहिती दिली आहे. यावेळी काही बंडखोर आमदार संपर्कात असल्याचा दावा मुख्यमंत्र्यांनी केला आहे.

💥एकनाथ शिंदेंचं हॉटेलच्या गेटवर येऊन ओपन चॅलेंज, म्हणाले…

विशेष म्हणजे, संजय राऊत, आदित्य ठाकरे हे बंडखोर आमदार आपल्या संपर्कात असल्याचा दावा गेल्या काही दिवसांपासून करत आहेत.अशातच, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी गुवाहाटी येथील शिवसेना आमदारांना आवाहन करत असलेले एक पत्रक प्रसिद्ध केले आहे.

‘माझं आपल्याला सगळ्यांना आवाहन आहे, आपण या माझ्या समोर बसा, शिवसैनिकांच्या आणि जनतेच्या मनातील संभ्रम दूर करा , यातून निश्चित मार्ग निघेल, आपण एकत्र बसून यातून मार्ग काढू . कोणाच्याही कोणत्याही भूल थापांना बळी पडू नका. शिवसेनेने जो मान सन्मान तुम्हाला दिला तो कुठेही मिळू शकत नाही, समोर आलात बोललात तर मार्ग निघेल . शिवसेना पक्ष प्रमुख आणि कुटुंब प्रमुख म्हणून आजही मला तुमची काळजी वाटत आहे . समोर येऊन बोला आपण मार्ग काढू ‘ असंही उद्धव ठाकरे म्हणाले.

असेच सुपरफास्ट अपडेट मिळवण्यासाठी या लिंकला क्लिक करा

दरम्यान, सेनेविरोधात बंद केलेल्या नेत्यांना संबोधत ‘आपण गेल्या काही दिवसांपासून गुवाहाटी येथे अडकून पडलेले आहात. आपल्या बाबत रोज नवीन माहिती समोर येत आहे. आपल्यातील बरेच संपर्कातही आहेत आपण आजही मनाने शिवसेनेत आहात. आपल्यापैकी काही आमदारांच्या कुटुंबातील सदस्यांनी देखील संपर्क साधून आपल्या मनातील भावना मला कळवल्या आहेत. आपल्या भावनांचा मी शिवसेनेचा कुटुंबप्रमुख म्हणून आदर करतो. कुटुंबप्रमुख म्हणून तुम्हाला मनापासून सांगतो अजूनही वेळ गेलेली नाही’अशी भावनिक साद मुख्यमंत्र्यांनी बंडखोर आमदारांना घातली आहे.

Comments are closed.