Take a fresh look at your lifestyle.

काय सरकार, काय मंत्री! शिंदे सरकारमध्ये शहाजीबापू पाटलांना कोणते खाते मिळणार?

maher

ओटीटी न्यूज नेटवर्क

सोलापूर : ‘काय झाडी, काय डोंगार, काय हाटील, समदं ओके मंदी हाय,’ या संवादामुळे सांगोल्याचे आमदार शहाजीबापू पाटील प्रसिद्ध झाले. सोलापूर जिल्ह्यातून माजी मंत्री सुभाष देशमुख आणि विजयकुमार पाटील यांची नावे मंत्रिपदासाठी चर्चेत आहेत. सोलापूर जिल्ह्याला दोन कॅबिनेट आणि एक राज्यमंत्रिपद मिळू शकते. त्या दृष्टीने आमदारांनी मोर्चेबांधणी केली आहे.

VIDEO: शिपाई ते सचिव सर्वांचं औक्षण, यशोमती ठाकूर यांनी घेतला कर्मचाऱ्यांचा भावुक निरोप

शहाजीबापू पाटील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे समर्थक आहेत. उद्धव ठाकरे यांच्याविरोधात बंड केलेल्या शिवसेना आमदारांमध्ये त्यांचा समावेश आहे. सुरुवातीपासून या बंडात शिंदे यांची साथ दिल्यामुळे निष्ठेचे फळ त्यांना मिळेल, असे मानले जात आहे.

भारतीय जनता पक्षाकडून माजी सहकारमंत्री सुभाष देशमुख आणि माजी मंत्री विजयकुमार देशमुख यांना संधी मिळू शकते. मात्र, नव्या चेहऱ्यांना संधी देण्याचे ठरल्यास काही अनपेक्षित नावेही समोर येऊ शकतात. त्यामध्ये अक्कलकोटचे आमदार सचिन कल्याणशेट्टी किंवा माळशिरसचे आमदार राम सातपुते यांचा राज्यमंत्रिपदासाठी विचार होऊ शकतो. आगामी विधानसभा निवडणुकीत जिल्ह्यात यश मिळविण्यासाठी कोण उपयुक्त ठरेल, असा निकष लावला जाऊ शकतो अशी राजकीय वर्तुळात चर्चा आहे.

उद्धव ठाकरेंचे मेहुणे श्रीधर पाटणकरांना ‘या’ प्रकरणात CBI कडून क्लिन चीट

बार्शीचे अपक्ष आमदार आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय राजेंद्र राऊत, करमाळ्याचे अपक्ष आमदार संजय शिंदे यांच्याबरोबरच विधान परिषदेतील आमदार रणजितसिंह मोहिते-पाटील यांच्यासुद्धा नावाचा विचार होऊ शकतो.

पालकमंत्र्यांकडे लक्ष

सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्रिपद कोणाकडे येते याला सर्वाधिक महत्त्व आहे. उद्धव ठाकरे सरकारमधील दत्तात्रय भरणे यांनी उजनीचे पाणी इंदापूर तालुक्यातील लाकडी-निंबोडीला नेल्यामुळे जिल्ह्यात कमालीची नाराजी आहे. ही नाराजी दूर करण्यासाठी तितक्याच तोलामोलाचा पालकमंत्री असण्याची गरज व्यक्त होत आहे.

असेच सुपरफास्ट अपडेट मिळवण्यासाठी या लिंकला क्लिक करा

Comments are closed.