Take a fresh look at your lifestyle.

Central Government Scheme: मोदी सरकार देतंय पती-पत्नीला तब्बल 10 हजारांचा लाभ; आजच ‘या’ योजनेसाठी अर्ज करा

maher

ओटीटी न्यूज नेटवर्क

मुंबई – Central Government Scheme नागरिकांच्या आर्थिक तसेच सर्वांगीण विकासाला चालना मिळावी तसेच प्रोत्साहन मिळावे याकरिता केंद्र सरकार तसेच राज्य सरकार नेहमीच प्रयत्नशील असते. देशातल्या प्रत्येक नागरिकाच्या (Citizen) सर्वांगीण विकासासाठी केंद्र सरकार सतत प्रयत्नशील असतं. त्यासाठी वेळोवेळी विविध कल्याणकारी योजना (Welfare Scheme) राबवल्या जातात. अगदी लहान बालकांपासून ते ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सर्वांच्या भवितव्याचा अशा योजनांमध्ये विचार केला जातो. तसं पाहिलं तर ज्येष्ठ नागरिक हे सक्रिय लोकसंख्येमध्ये सहभागी नसतात.

पेट्रोल डिझेलच्या पाठोपाठ पुन्हा खूशखबर; खाद्य तेलांच्या दरात मोठी घसरण

देशाच्या विकासामध्ये त्यांचा फारसा प्रत्यक्ष सहभाग नसतो. असं असलं, तरी सरकार आपल्या देशातल्या ज्येष्ठ नागरिकांचा वृद्धापकाळ चांगला जावा यासाठी प्रयत्नशील असतं. भारत सरकारनं देशातल्या नागरिकांसाठी अटल पेन्शन योजना (Atal Pension Scheme) सुरू केली आहे. या सरकारी योजनेत गुंतवणूक करून तुम्ही मासिक पेन्शन (Monthly Pension) मिळवू शकता. दिवंगत भाजप नेते आणि माजी अर्थमंत्री अरुण जेटली (Arun Jaitley) यांनी 2015 मध्ये ही योजना सुरू केली आहे. असंघटित कुटुंबांना भक्कम आर्थिक साह्य देण्याच्या उद्देशानं ही योजना सुरू केली आहे. या योजनेत पती-पत्नीला मिळून दहा हजार रुपयांपर्यंतच्या पेन्शन योजनेचा लाभ मिळू शकतो. टाइम्स बुल डॉट कॉमने याबाबत माहिती देणारं वृत्त प्रसिद्ध केलं आहे.

तुम्ही देखील SBI चे ग्राहक असाल तर लगेच करा ‘हे’ महत्त्वाचं काम, अन्यथा भरावा लागेल दंड

अटल पेन्शन योजनेची सुरुवात 2015 मध्ये झाली. असंघटित क्षेत्रात (Unorganized Sector) काम करणाऱ्या कामगारांच्या वृद्धापकाळाचा (Old Age) विचार करून ही योजना सुरू करण्यात आली होती. पण, आता भारतात राहणारी 18 ते 40 वर्षं वयोगटातली कोणीही व्यक्ती या योजनेत गुंतवणूक (Investment) करू शकते, जेणेकरून वयाच्या साठीनंतर संबंधित व्यक्तीला दर महिन्याला पेन्शनचा लाभ मिळेल.

एखाद्या व्यक्तीनं वयाच्या 18 व्या वर्षी ही योजना सुरू केली तर वयाच्या 60 वर्षांनंतर तिला पाच हजार रुपये मासिक पेन्शन मिळवता येऊ शकतं. त्यासाठी दरमहा 210 रुपये जमा करावे लागतील.

PAN-Aadhaar लिंक होत नाहीय? जाणून घ्या कारणं; असं करा ऑनलाइन पद्धतीने पॅन कार्ड (PAN Card) आधार कार्डशी लिंक

विशेष म्हणजे या योजनेत टॅक्स सूटदेखील उपलब्ध आहे. इनकम टॅक्स कायदा 80Cनुसार, अटल पेन्शन योजनेच्या लाभार्थ्यांना 1.5 लाख रुपयांपर्यंतचा टॅक्स बेनिफिट (Tax Benefit) मिळतो. काही केसेसमध्ये, 50 हजार रुपयांपर्यंतचा एक्स्ट्रा टॅक्स बेनिफट मिळतो. म्हणजेच तुम्हाला एकूण दोन लाख रुपयांपर्यंतची सूट मिळू शकते. याशिवाय, एखाद्या व्यक्तीचा वयाच्या 60 व्या वर्षापूर्वी मृत्यू झाला तर त्याची पत्नी किंवा पती ही योजना सुरू ठेवू शकतात आणि पेन्शनचा लाभ मिळवू शकतात. याशिवाय पतीच्या मृत्यूनंतर पत्नी एकरकमी रकमेवर दावा करू शकते. पत्नीचाही मृत्यू झाल्यास तिच्या नॉमिनीला एकरकमी रक्कम मिळते.

पेट्रोल-डिझेलपाठोपाठ सीएनजीचीही दरवाढ! सीएनजी ८० रुपये किलो

अटल पेन्शन योजनेत तुम्हाला एक हजार, दोन हजार, तीन हजार, चार हजार आणि जास्तीत जास्त पाच हजार रुपये मासिक पेन्शन मिळू शकते. या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला रजिस्ट्रेशन करावं लागेल. रजिस्ट्रेशनसाठी, तुमच्याकडे सेव्हिंग्ज अकाउंट, आधार नंबर आणि मोबाइल नंबर असणं गरजेचं आहे.

असेच सुपरफास्ट अपडेट मिळवण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

Comments are closed.