Take a fresh look at your lifestyle.

मोदी सरकार ‘ही’ योजना बंद करणार; नवा नियम कधी लागणार?

0
maher

ओटीटी न्यूज नेटवर्क

मुंबई : केंद्र सरकार पुढील महिन्यापासून अटल पेन्शन योजनेत मोठा बदल करणार आहे. ऑक्टोबर महिन्यापासून ही योजना अनेकांसाठी बंद करण्यात येत आहे. म्हणजेच आता देशातील अनेक लोकांना अटल पेन्शन योजनेच्या नवीन नियमांनुसार आयकर भरणाऱ्यांना या योजनेचा लाभ घेता येणार नाही. या सरकारी योजनेचा नवा नियम ऑक्टोबर 2022 पासून लागू होणार आहे.

पिकविमा नुकसानीच्या सर्वेक्षण यादीतून अनेक शेतकऱ्यांची नावे गहाळ  

तुम्ही देखील करदाते असाल आणि या सरकारी योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर तुमच्याकडे फक्त सप्टेंबर महिना आहे. पुढील महिन्यापासून तुम्ही अटल पेन्शन योजनेचा लाभ घेऊ शकणार नाही. करदात्यांना ३० सप्टेंबरपर्यंत या योजनेचा लाभ घेता येईल. मात्र, ज्यांनी आधीच खाते उघडले आहे, त्यांना या योजनेचा लाभ मिळत राहील. अटल पेन्शन योजना खाते 1 ऑक्टोबरनंतर उघडल्यास आणि व्यक्ती आधीच आयकर भरत असल्यास खाते बंद केले जाईल.

‘ई -केवायसी’ केली तरच मिळेल पीएम किसान योजनेचा बारावा हप्ता; शासनातर्फे 7 सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ

१८ ते ४० वयोगटातील कोणताही भारतीय नागरिक याचा लाभ घेऊ शकतो. तुम्हालाही पेन्शनचा लाभ घ्यायचा असेल तर तुम्ही त्यात खाते उघडू शकता. याशिवाय, या योजनेत, तुम्हाला आयकर कलम 80CCD अंतर्गत कर सवलतीचा लाभ मिळतो.

असेच सुपरफास्ट अपडेट मिळवण्याकरिता या लिंकवर क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.