Take a fresh look at your lifestyle.

मोदी सरकारचा मोठा निर्णय; BSNL चे ‘अच्छे दिन’ येणार

0

ओटीटी न्यूज नेटवर्क

नवी दिल्ली : केंद्रातील मोदी सरकारने BSNL 4G सेवांबाबत अनेक मोठे निर्णय घेतले आहेत. बीएसएनएलला अच्छे दिन येणार आहेत. केंद्रीय मंत्रिमंडळाने बीएसएनएलला १.६४ लाख कोटी रुपयांचे पॅकेज मंजूर केले आहे. कंपनी या पैशाचा वापर आपले नेटवर्क आणि सेवा सुधारण्यासाठी करणार आहे. बीएसएनएलच्या नव्या योजनेअंतर्गत आता २४ हजार ६८० गावांमध्ये ४जी सेवा सुरू होणार आहे. त्यासाठी देशात १९ हजार ७२२ मोबाईल टॉवर बसवले जाणार आहेत. केंद्र सरकारने भारत संचार निगम लिमिटेड (BSNL) आणि भारत ब्रॉडबँड नेटवर्क (BBNL) यांच्या विलीनीकरणालाही मान्यता दिली आहे.

भारतीय शेअर बाजार नव्या रेकॉर्डसाठी सज्ज

भारतात 5G लवकरच बाजारात उपलब्ध होणार आहे. Jio, Airtel आणि Vi सारख्या कंपन्या 5G सेवा सुरू करण्याच्या तयारीत आहेत. दुसरीकडे, देशातील सरकारी टेलिकॉम कंपनी बीएसएनएल अद्याप संपूर्ण देशात आपले 4G नेटवर्क सुरू करू शकलेली नाही. केंद्रीय मंत्रिमंडळाने बीएसएनएल अपग्रेड करण्यासाठी अनेक मोठे निर्णय घेतले आहेत. या अंतर्गत बीएसएनएलला आर्थिक मदत केली जाणार आहे. कंपनी देशात अनेक ठिकाणी नवीन मोबाईल टॉवर बसवून आपली 4G सेवा सुरू करणार आहे.

शिवसेना मिळवण्यासाठी एकनाथ शिंदेंचा पुन्हा मास्टर प्लान?

दूरसंचार मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितले की, मंत्रिमंडळाच्या निर्णयानंतर आता देशातील 24 हजार 680 गावांमध्ये BSNL 4G सेवा पुरविली जाईल. या क्षेत्रात ४जी सर्विस देण्यासाठी कंपनीला २६ हजार ३१६ कोटी रुपये पॅकेजला मंजुरी दिली आहे. इतकेच नाही तर 6,279 गावांची निवड करण्यात आली आहे. जिथे 2G आणि 3G सेवा सध्या उपलब्ध आहे. ही गावे अपग्रेड करताना 4G नेटवर्क कार्यान्वित केले जाईल. बीएसएनएल देशात 19 हजार 722 मोबाईल टॉवर बसवणार आहे.

जात प्रमाणपत्र पडताळणी करतांना खोटे कागदपत्र सादर करू नये – उपायुक्त सुरेंद्र पवार

केंद्र सरकारने संपूर्ण भारतात BSNL 4G सेवा देण्यासाठी कंपनीला चांगले पॅकेज दिले आहे. BSNL ला नवीन तंत्रज्ञान आणि 4G सेवेसाठी अपग्रेड करण्यासाठी 26 हजार कोटींची मोठी रक्कम दिली जाणार आहे. याशिवाय, ग्रामीण भागात वायरलाइन सेवा देण्यासाठी बीएसएनएलला 13 हजार 789 कोटी रुपयांची इक्विटी उपलब्ध करून दिली जाईल. केंद्राच्या या मदतीमुळे बीएसएनएलचा इक्विटी बेस 40 हजार कोटी रुपयांवरून 1.50 लाख कोटी रुपयांपर्यंत वाढेल.

असेच सुपरफास्ट अपडेट मिळविण्याकरिता या लिंकवर क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.