Take a fresh look at your lifestyle.

‘या’ देशात उभारलं जाणार ‘मून रिसॉर्ट’; सोशल मीडियावर चर्चांना उधाण

0
maher

ओटीटी न्यूज नेटवर्क

जगातील सर्वात उंच इमारत बुर्ज खलिफा (Burj Khalifa) दुबई शहरात आहे. त्याचप्रमाणे, बुर्ज अल अरब सारखी संग्रहालये देखील पर्यटकांच्या आवडत्या आकर्षणांपैकी एक आहेत. आता समोर आलेल्या एका वृत्तानुसार दुबईमध्ये एक आलिशान रिसॉर्ट बांधले जाणार असून हे रिसॉर्ट चंद्राच्या (Moon Resort) थीमवर आधारित असेल. या रिसॉर्टचे काही कॉन्सेप्ट बेस फोटो सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहेत.

दुबईतील चंद्रासारखा हा रिसॉर्ट तयार करण्यासाठी जवळपास 5 बिलियन अमेरिकन डॉलर्स खर्च केले जातील. भारतीय चलनात ही रक्कम जवळपास ४० हजार कोटी आहे. अरेबियन बिझनेसच्या अहवालानुसार, मून वर्ल्ड रिसॉर्ट्स इंटरनॅशनल ही कॅनडाची कंपनी हे रिसॉर्ट बांधण्याचे काम करणार आहे. ही इमारत ७३५ फूट उंच असेल. येत्या चार वर्षांत ही इमारत पूर्ण होईल, असा अंदाज आहे.

केंद्रीय निवडणूक आयोगाचा तब्बल ३३९ पक्षांना दणका; विविध राज्यातील पक्षांवर कारवाई

या रिसॉर्टमध्ये सर्व आधुनिक सुविधा असतील. यात स्पा सेंटर, नाईट लाईफसाठी विशेष सेक्शन्सही असतील. या रिसॉर्टमधील मुख्य रस्ता गोलाकार असणार आहे. या रिसॉर्टला दरवर्षी २५ लाख पर्यटक भेट देतील अशी अपेक्षा आहे. रिसॉर्ट इमारतीच्या वरच्या मजल्यावरील २३ टक्के भाग कॅसिनोसाठी असेल. ९ टक्के जागा नाईटक्लबसाठी तर ४ टक्के हॉटेल्ससाठी राखीव ठेवण्यात येणार आहेत. रिसॉर्टच्या टेरेसचा एक तृतीयांश भाग बीच क्लबसाठी वापरला जाईल. खालचा एक तृतीयांश भाग तलावासाठी वापरला जाईल आणि चार टक्के भाग अ‍ॅम्फी थिएटरसाठी बांधला जाईल.

मोठी बातमी : केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचा मोठा निर्णय; कॅन्सर उपचाराची औषधे स्वस्त होणार

संयुक्त अरब अमिराती म्हणजेच UAE मध्ये पर्यटन सध्या तेजीत आहे. “आमच्या देशाची पर्यटनसंबंधित आर्थिक उलाढाल २०२२ च्या पहिल्या सहा महिन्यांत १९ बिलीयन द्राम्सचा टप्पा ओलांडला आहे.” असे शेख मोहम्मद यांनी WAM वृत्तसंस्थेने म्हटलं केले. “हॉटेलमधील पाहुण्यांची संख्या 1.2 दशलक्षाहून अधिक आहे, 42 टक्क्यांनी वाढ झाली आहे. हिवाळ्यातही मोठ्या संख्येनं पर्यटक येण्याची अपेक्षा आहे.” असेही शेख मोहम्मद म्हणाले.

या मून रिसॉर्टच्या सहसंस्थापकांपैकी एक असलेल्या मायकल आर हेंडरसन यांनी या मून रिसॉर्टमुळे पर्यटकांची संख्या नक्कीच वाढेल, असा विश्वास व्यक्त केला आहे. “हा मून रिसॉर्ट देशाच्या सेवा क्षेत्र, मनोरंजन, पर्यटन, शिक्षण, तंत्रज्ञान, अंतराळ आणि अंतराळ पर्यटनासाठी योगदान देईल,” असं हेंडरसन म्हणाले.

असेच सुपरफास्ट अपडेट मिळवण्याकरिता या लिंकवर क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.