Take a fresh look at your lifestyle.

खासदार नवनीत राणा यांच्या अडचणी वाढणार?; मुंबईस्थित कोर्टाने बजावले अजामीनपात्र वॉरंट

0

ओटीटी न्यूज नेटवर्क

मुंबई : अमरावतीच्या खासदार नवनीत राणा या गेल्या अनेक महिन्यांपासून चांगल्याच चर्चेत आहे, यामागील कारणे देखील निरनिराळी आहेत. हनुमान चालीसा प्रकरण असो की युवती अपहरण प्रकरणात खासदार राणा यांची आक्रमक भूमिका असो अशा विविध मुद्द्यानी राज्य नव्हे तर देशपातळीवर त्या चर्चेत राहिल्या आहे. आता नवनीत राणा यांना मुंबईतील न्यायालयाने अजमानीपत्र वॉरंट बजावले याचे नेमके कारण हे जुने आहे.

“शिवसेनेला न्याय मिळाला ही समाधानकारक बाब” – अजित पवार

सविस्तर वृत्त असे की, खासदार नवनीत राणा व त्यांचे वडील हरभजन सिंग यांनी शाळा सोडल्याचा बनावट दाखला बनवून त्यावरून फसवणूक करत जात प्रमाणपत्र दाखला मिळवला होता, हा जातप्रमाणपत्र दाखला अनुसूचित जातीचा आहे, असा आरोप करत तक्रार दाखल करण्यात आलेली आहे. सदर प्रकरणी खासदार राणा यांचे वडील हरभजन सिंग यांच्याविरुद्ध मुंबईच्या मुलुंड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली होती.

दोन महिन्यांत राज्य खड्डेमुक्त होणार?; सचिवांनी दिले आश्वासन

अनुसूचित जातीच्या प्रमाणपत्राद्वारे नवनीत राणा यांनी अमरावती मतदारसंघातून खासदार म्हणून विजय प्राप्त केला होता. आपण अनुसूचित जातीचे प्रतिनिधित्व करतो असे विधान नवनीत राणा या नेहमी करत असतात. सदर प्रकरणावर पुन्हा सुनावणी झाल्याने मुंबईस्थित न्यायालयाने नवनीत राणा यांच्या वडिलांविरोधात अजामीनपत्र वॉरंट काढले आहे, यामुळे लवकरच नवनीत राणा यांच्या अडचणीत देखील वाढ होऊ शकते. आतापर्यंत शिवडी महानगर दंडाधिकारी न्यायालयाकडून तब्बल दोनदा अजामीनपत्र वॉरंट जारी केल्याने यावेळी नक्कीच काहीतरी कारवाई होण्याचे संकेत आहे, त्यामुळे लवकरच नवनीत राणा यांना अडचणींचा सामना करावा लागण्याची दाट शक्यता वर्तविण्यात येत आहे.

असेच सुपरफास्ट अपडेट मिळवण्याकरिता या लिंकवर क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.