Take a fresh look at your lifestyle.

ऐन सणासुदीत शेतकऱ्यांना फटका; MSP जाहीर करण्यास दिरंगाई

0

ओटीटी न्यूज नेटवर्क

मुंबई : सप्टेंबर संपला आणि रब्बी पिकांच्या पेरणीला सुरुवात झाली. या पिकासाठी शेतकरीही तयारीला लागले. मात्र, मोदी सरकारने अजूनही रब्बी पिकांची किमान आधारभूत किंमत (MSP) जाहीर केलेली नाही. सरकारने नियमाप्रमाणे MSP सप्टेंबरमध्येच जाहीर करायला हवा होता. मात्र सरकार MSP जाहीर करण्यात दिरंगाई करत आहे.

अंबानी कुटुंबाला धमकी दिल्याप्रकरणी बिहारमधून आरोपीला अटक

गतवर्षी गहू, मोहरी आणि इतर सर्व रब्बी पिकांसाठी 8 सप्टेंबर रोजी MSP जाहीर केला होता. 2020 मध्येही MSP सप्टेंबरमध्ये जाहीर केला होता. मात्र यंदा सप्टेंबर उलटून गेला तरी MSP जाहीर करण्यात आला नाही. मोदी सरकार MSP कधी जाहीर करणार, याकडे शेतकरी नजर ठेऊन आहे.

दरम्यान, 1968 पासून पेरणीच्या एक महिना आधी MSP जाहीर करण्याची परंपरा आहे, असं माजी कृषी राज्यमंत्री सोमपाल शास्त्री यांनी सांगितले आहे. अगदी काही वर्षे वगळता, रब्बी पिकांसाठी एमएसपी साधारणपणे सप्टेंबर महिन्यात जाहीर केला जातो.

मुख्यमंत्र्यांच्या BKC मधल्या भाषणाची स्क्रिप्ट कोणी लिहून दिली? मिटकरींनी लगावला टोला

MSP म्हणजे आहे?

एमएसपी हा दर आहे, ज्या दराने सरकार शेतकऱ्यांकडून पिकांची खरेदी करते आणि शेतकऱ्यांनी केलेल्या उत्पादन खर्चाच्या किमान दीडपट मोजणीवर आधारित असते. कृषी खर्च आणि किमती आयोगाच्या शिफारशींच्या आधारे, भारत सरकारचा कृषी आणि सहकार विभाग, त्यांच्या पेरणीच्या हंगामापूर्वी 22 पिकांसाठी किमान आधारभूत किंमत (MSP) जाहीर करतो. भारतात पहिल्यांदा 1966-67 मध्ये याची सुरुवात झाली.

असेच सुपरफास्ट अपडेट मिळवण्याकरिता या लिंकवर क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.